Yuvraj Singh, मोहम्मद कैफसह तेंडुलकरही आयपीएल लिलावात उतरणार; जाणून घ्या किती आहे मूळ किंमत ?

IPL Auction 2025 : आयपीएल २०२५ हंगामाचा लिलाव सौदी अरेबीयातील जेद्दाह शहरात २४ व २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ipl auction
ipl auctionesakal
Updated on

IPL Auction 2025 : सौदी अरेबीयातील जेद्दाह या शहरात २४ व २५ नोव्हेंबर रोजी आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन होणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी १० फ्रॅंचायझींनी एकूण ४६ खेळाडूंना आगामी आयपीएल हंगामासाठी संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. ज्यात ११६५ भारतीय आणि ४०९ परदेशी खेळाडू आहेत. तर या यादीत ३२० कॅप्ड, १२२४ अनकॅप्ड खेळाडू आणि संलग्न राष्ट्राच्या ३० खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी युवराज सिंग, मोहम्मद कैफ व तेंडुलकरही लिलावात आपल्याला पाहायला मिळतील.

मोहम्मद कैफची मूळ किंमत ३० लाख रुपये

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात नोंदणी केलेल्या मोहम्मद कैफने आपली मूळ किंम्मत ३० लाख रूपये ठेवली आहे. मोहम्मद कैफ स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भाऊ असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. शमीप्रमाणेच मोहम्मद कैफनेही वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने ८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतले आहेत आणि ९ लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १२ विकेट आहेत.

ipl auction
IPL Mega Auction 2025: OMG! दिल्ली कॅपिटल्स 'या' खेळाडूसाठी तब्बल २५ कोटी मोजणार; रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करणार

युवराज सिंगची मूळ किंमत ३० लाख रुपये

क्रिकेटपटू युवराज सिंगने आयपीएल २०२५ लिवासाठी आपले नाव नोंदवले आहे. ज्यामध्ये त्याने आपली मुळ किंम्मत ३० लाख रूपये ठेवली आहेत. हा २७ वर्षीय युवक उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो रेल्वे संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आत्तापर्यंत एकही ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. त्याने ७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण २८३ धावा केल्या आहेत. तर, त्याने ३ लिस्ट-ए सामन्यांत १२१ धावा केल्या आहेत.

तेंडुलकरचीही मूळ किंमत ३० लाख रुपये

मास्टर ब्लास्टर तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आत्तापर्यंत मुंबई संघाचा भाग होता. त्याने मागच्या हंगामात आयपीएलमधील पदार्पणाचा सामना खेळला. मुंबई इंडियन्सने रोहित, हार्दिक, बुमराह, सूर्यकुमार आणि तिलक वर्मा या प्रमुख पाच खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तर त्यांनी २५ वर्षीय अर्जुन तेंडुलकरला रिलीज केले. त्यामुळे अर्जुन आता लिलावात उतरला आहे. अर्जुनने आपली मुळ किंम्मत ३० लाख रूपये ठेवली असून लिलामध्ये मुंबई इंडियन्स अर्जुनला पुन्हा खरेदी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.