Video: डान्स मस्त अन् शेवटची स्टेप भारीच! युवराज सिंगकडून Shubman Gill ला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
Yuvraj Singh-Shubman Gill: भारतीय सलामीवीर शुभमन गिलचा रविवारी (८ सप्टेंबर) २५ वा वाढदिवस आहे. चाहत्यांकडून, क्रीडा क्षेत्रातील नामांकित लोकांकडून शुभमनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये भारतीय माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही सोशल मीडियावर अनोखा व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
याआधी देखील शुभमनचा युवराज सिंगची कार चालवतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता. यावरून युवराज सिंग आणि शुभमन गिल यांच्यामधील गुरू-शिष्याचे नाते मैत्रीपूर्ण असल्याचे दिसून येते. शुभमनने सुरुवातीच्या काळात युवराज सिंगकडून फलंदाजी प्रशिक्षण घेतले आहे.
शुभमनला शुभेच्छा देताना युवराज म्हणाला, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गिलसाहेब. तुम्ही करत असलेला प्रवास खरोखरच अभिमानास्पद आहे. खेळावर लक्ष केंद्रित करा, आणखी कठोर परिश्रम करा आणि या प्रवासाचा आनंद घ्या! पुढचे वर्ष तुमच्यासाठी सुंदर जावो. व्हिडिओतील नृत्य आवडले. शेवटीची स्टेप भारी होती."
युवराज सिंगसोबतच जय शाह, बीसीसीआय, मुंबई इंडियन्स अशा नामंकित सोशल मिडीया हॅंडल्सवरून शुभमनला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह म्हणाले, "क्रिकेटच्या उगवत्या सिताऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू आंतरराष्ट्रीय कारर्किदिची सुरुवात अतुलनीय शांतता आणि आत्मविश्वासाने केलीस. मी तुझ्याकडून भारतीय संघासाठी आणखी अनेक विजयी खेळींची वाट पाहत आहे. पुढील वर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!"
शुभमन सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये भारत-अ संघाचे नेतृत्व करत आहे. दुलीप ट्रॉफीनंतर शुभमन बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ॲक्शन मोडवर दिसण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होणार आहे, त्यानंतर दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.