IND vs ENG: 'तो विजय ज्यानं एका पिढीला प्रेरणा दिली...' युवीने शेअर केला लॉर्ड्सवरील २२ वर्षांपूर्वीचा दादागिरीचा फ्लॅशबॅक

NatWest Series 2002: भारतीय संघाने २२ वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयानंतर सौरव गांगुलीनं केलेलं सेलीब्रेशन आयकॉनिक ठरलं.
India vs England | NatWest Series 2002
India vs England | NatWest Series 2002Sakal
Updated on

NatWest Series 2002 India vs England: १३ जुलै म्हटलं की अनेक भारतीयांना एक सामना हमखास आठवतो आणि आठवतो तो सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या गॅलरीत फिरवलेली जर्सी... तो सामना होता नॅटवेसट मालिकेतील अंतिम सामना.

लॉर्ड्सवर हा सामना भारत आणि इंग्लंड संघात खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतानं २ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला होता. याच विजयाची आठवण आता माजी क्रिकेटपटू आणि त्या प्रसिद्ध विजयाचा साक्षीदार राहिलेल्या युवराज सिंगने काढली आहे.

लॉर्ड्सवरील विजयाच्या २२ व्या वर्षपूर्तीनिमित्त युवराजने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'असा विजय ज्यामुळे एका पिढीला प्रेरणा मिळाली.' या व्हिडिओमध्ये ३ फेब्रुवारी २००२ ला मुंबईत इंग्लंडने भारताला पराभूत केल्यानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफने केलेलं सेलिब्रेशनची झलक आहे.

त्यानंतर त्याच सेलिब्रेशनचे प्रत्युत्तर म्हणून तत्कालिन भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने १३ जुलैला लॉर्ड्सवर विजय मिळवल्यानंतर बाल्कनीत अंगातील जर्सी काढून ती हातात घेत फिरवली होती.

त्यावेळी त्याच्या आजूबाजूला भारताने अन्य खेळाडूही होते. याची झलकही युवराजच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गांगुलीचे ते शर्टलेस सेलीब्रेशन आजही आयकॉनिक सेलिब्रेशनमध्ये गणले जाते.

India vs England | NatWest Series 2002
Team India Coach: गौतम गंभीरचा 'माणूस' BCCI ला नकोसा? बॉलिंग कोचसाठी उतरवले दोन तगडे स्पर्धक

काय झालेलं सामन्यात?

खरंतर ३ फेब्रुवारी २००२ रोजी जेव्हा इंग्लंडने वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध विजय मिळवला होता, त्यावेळी फ्लिंटॉफने अंगातील जर्सी काढून मैदानात सेलीब्रेशन केले होते. ते पाहून गांगुली निराश झाला होता.

त्यानंतर त्याचवर्षी १३ जुलैला भारत आणि इंग्लंड पुन्हा आमने-सामने आले, पण यावेळी लॉर्ड्सवर. त्यावेळी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 325 धावा केल्या होत्या.

इंग्लंडकडून मार्कस ट्रेस्कोथिकने १०९ धावा आणि नासिर हुसेनने ११५ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर फ्लिंटॉफनेही ४० धावा केल्या होत्या. भारताकडून वेगवान गोलंदाज झहीर खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर ३२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांनी १०६ धावांची शतकी भागीदारी केली. मात्र, गांगुलीने ६० धावांवर विकेट गमावली, तर सेहवाग ४५ धावांवर बाद झाला. यानंतर भारताने सचिन तेंडुलकर, दिनेश मोंगिया, राहुल द्रविड यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.

India vs England | NatWest Series 2002
Team India Matches: वर्ल्ड कप 2026 पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह 7 संघाविरुद्ध खेळणार T20 सामने, पाहा टाईमटेबल

मात्र, त्यानंतर संघात युवा खेळाडू असलेले मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी ६ व्या विकेटसाठी १२० धावांची भागादारी करत भारताच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, अशातच युवराजने कॉलिंगवूडला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ६९ धावांवर विकेट गमावली.

मात्र, त्यानंतरही कैफने आक्रमक खेळताना हरभजन सिंगबरोबर ४७ धावांनी भागीदारी केली. मात्र भारत विजयाच्या जवळ असतानाच हरभजन आणि पाठोपाठ अनिल कुंबळे यांना फ्लिंटॉफनं बाद केलं. अखेरच्या दोन षटकात ११ धावांची आवश्यका भारताला होती, तर इंग्लंडला २ विकेट्सची गरज होती.

यावेळी कैफला झहीर खान साथ देत होता. त्यांनी ४९ व्या षटकात ९ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात २ धावा हव्या होत्या. या षटकात पहिल्या दोन चेंडूवर झहीरला एकही धाव घेता आली नाही.

मात्र तिसऱ्या चेंडूवर झहीर आणि कैफने दोन धावा पळून काढत भारताचा विजय निश्चित केला. या सामन्यात कैफने ७५ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या, तर झहीर ४ धावा करून नाबाद राहिला. या सामन्यानंतर कैफला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. (Sourav Ganguly Shirtless Celebration at Lords balcony)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.