Abhishek Sharma: यश एका दिवसाचं नाही...! युवराजने आपल्या शिष्यानं शतक ठोकल्यानंतर शेअर केला 'तो' Video

India vs Zimbabwe: अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात शतक ठोकले. त्याच्या या शतकानंतर त्याचा गुरु युवराज सिंगने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
Abhishek Sharma | Team India
Abhishek Sharma | Team IndiaSakal
Updated on

Abhishek Sharma: झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात रविवारी (७ जुलै) टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना पार पडला. हरारेला झालेल्या या सामन्यात भारताने १०० धावांनी विजय मिळवला.

भारताच्या या विजयात अभिषेक शर्माने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीबद्दल कौतुक करताना माजी अष्टपैलू युवराज सिंगने त्याचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की शनिवारी (६ जुलै) भारताकडून झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या टी२० मधून अभिषेकने पदार्पण केले होते. परंतु तो शुन्यावरच बाद झाला होता. पण, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याने दमदार शतक केले.

Abhishek Sharma | Team India
IND vs ZIM, T20I: एकदिवस आधी शुन्यावर आऊट झालेल्या अभिषेकचा दुसऱ्याच दिवशी शतकी धमाका, दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

अभिषेकने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतकही ठरले. त्याला या शतकाबद्दल सामनावीर पुरस्कारही मिळाला. या सामन्यानंतर अभिषेकने त्याचा गुरू आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला व्हिडिओ कॉलही केला होता.

अभिषेक युवराजच्या हाताखाली तयार झाला आहे. त्यामुळे अभिषेकची इथपर्यंत येण्याच्या प्रवासात युवराजचे मोठे योगदान राहिले असून त्याने त्याची सर्व तयारीही पाहिली आहे. याच तयारीचा व्हिडिओ युवराजने सोमवारी शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिषेक जोरदार ट्रेनिंग करताना दिसत आहे. तसेच मैदानातही घाम गाळताना दिसतोय.

Abhishek Sharma | Team India
IND vs ZIM: शतक करण्यासाठी अभिषेकला लकी ठरली शुभमन गिलची बॅट, सामन्यानंतर उलगडलं मोठं रहस्य

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये यश एका दिवसात मिळत नाही अशा अर्थानं युवराजने लिहिलंय, 'रोम एकादिवसात बांधले गेले नाही. अभिषेक तुझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकापर्यंतच्या प्रवासाबद्दल अभिनंदन. अजून खूप बाकी आहे.'

यापूर्वीही युवराजने अनेकदा अभिषेकचे कौतुक केले आहे. अभिषेकने आयपीएल २०२४ मध्येही शानदार कामगिरी केली होती. त्याने आयपीएल २०२४ मध्ये १६ सामन्यांमध्ये जवळपास २०४ च्या स्ट्राईक रेटने ४८४ धावा केल्या आहेत. तसेच २ विकेट्स घेतल्या आहेत.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.