Yuzvendra Chahal Video: चहल इंग्लंडमध्ये चमकतोय; निम्मा संघ एकट्यानंच धाडला पॅव्हेलियनमध्ये

Yuzvendra Chahal 5 Wickets Haul: युझवेंद्र चहल सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत असून नुकतेच त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalSakal
Updated on

Yuzvendra Chahal 5 Wickets Video: भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो नॉर्थहॅम्प्टनशायर क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहे. त्याची कामगिरीही चांगली होत आहे. नुकतेच त्याने डर्बीशायरविरुद्ध खेळताना पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

या सामन्यात त्याने डर्बीशायरच्या पहिल्या डावात १६.३ षटके गोलंदाजी करताना ४५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याला नॉर्थहॅम्प्टनशायरचा आणखी एक फिरकीपटू रॉब केफचीही चांगली साथ मिळाली. त्यानेही ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे डर्बीशायरचा डाव ६१.३ षटकात १६५ धावांवर उरकला.

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal : झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाची घोषणा होताच युझवेंद्रची कारकीर्द आली संपुष्टात?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.