Yuzvenra Chahal
Yuzvenra ChahalSakal

Yuzvendra Chahal Video: १० षटकं, १४ धावा अन् ५ विकेट्स! युझवेंद्र चहलचा वन डे सामन्यात दमदार परफॉर्मन्स

Yuzvendra Chahal 5 Wickets: युजवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये खेळताना नुकतेच एका वनडेत ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
Published on

One Day Cup, Northamptonshire vs Kent: इंग्लंडमध्ये सध्या वनडे कप ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने पदार्पण केले आहे. महत्त्वाचं म्हणजे पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शानदार कामगिरी केली आहे.

तो नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळत असून बुधवारी (१४ ऑगस्ट) केंट विरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना खेळला. त्याने या सामन्यात नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी पाच विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. नॉर्थहॅम्प्टनशायरने हा सामना ९ विकेट्सने जिंकला.

या सामन्यात केंटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सुरुवातीला नॉर्थहॅम्प्टनशायरच्या जस्टीन ब्रॉड आणि ल्युक प्रोक्टर यांनी केंटला धक्के दिल्यानंतर मधल्या षटकांमध्ये युजवेंद्र चहलने कमाल केली.

Yuzvenra Chahal
Yuzvendra Chahal : झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाची घोषणा होताच युझवेंद्रची कारकीर्द आली संपुष्टात?
Loading content, please wait...