Zaheer Khan Marathi Speech : नमस्कार! मराठीच प्लॅन केलं होतं... धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमात चर्चा जहीर खानचीच

Zaheer Khan : जहीर खानने धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमात मराठीतून भाषण करत सोयी सुविधांच्या मुद्द्याला घातला हात
Zaheer Khan
Zaheer Khan
Updated on

Zaheer Khan Marathi Speech : भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान हा आज परळी दौऱ्यावर होता. यावेळी त्याने राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या संकल्पेनेतून सुरू झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा फायनल सामना पाहण्याचा आनंद लुटला. यावेळी जहीर खानने मराठीतून भाषण करत सर्वांचे मन जिंकले.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, परळीत नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेली डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा फायनलचा सामना पाहण्यासाठी आणि बक्षिस वितरण्याच्या कार्यक्रमासाठी दिग्गज क्रिकेटपटू झहीर खान आणि युवराज सिंह यांनी हजेरी लावली होती. यावेळी झहीर खानने मराठीतू भाषण केले.

Zaheer Khan
Gautam Gambhir : आयपीएल हे बॉलीवूड, पार्टी याबद्दल नाही तर... शाहरूखच्या संघाला 'गंभीर' इशारा

भाषणाच्या सुरूवातीलाच त्याने उपस्थितांना नमस्कार करत मी आज मराठीतूनच भाषण करण्याचं ठरवलं आहे. याव व्याक्यावर प्रेक्षकांमधून टाळ्या पडल्या. यानंतर युवराज सिंगला मी भाषणात काय बोललो हे नंतर सांगेन असंही तो म्हणाला.

मूळचा श्रीरामपूरचा असलेल्या जहीर खानने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत टमी देखील टेनिस क्रिकेट स्पर्धा खूप खेळायचो आज मला त्या गोष्टीची आठवण येत होती. माझी देखील क्रिकेटची सुरूवात अशीच झाली होती.'

Zaheer Khan
IPL 2024 KL Rahul : केएल राहुल आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? फिटनेसवर आली मोठी अपडेट

'मला ऐकून फार बरं वाटलं की धनंजय मुंडे साहेबांनी आज आम्ही आलोय त्याच दिवशी इथं क्रिकेट स्टेडियम उभारण्याची घोषणा केली आहे.'

'टेनिस बॉलने सुरू केलंय म्हणजे तुम्ही वरचं क्रिकेट खेळू शकत नाही किंवा सिजन बॉलने खेळू नाही शकत असं होत नाही. त्यासाठी फक्त सुविधा हव्या असतात.'

(Cricket Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.