IND vs ZIM: शेवटच्या T20 सामन्यासाठी टीम इंडियात दोन मोठे बदल; ऋतुराज गायकवाड प्लेइंग-11 मधून बाहेर

India vs Zimbabawe: झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये मोठे बदल झाले आहेत.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India vs Zimbabwe 5th T20I, Playing XI: भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटचा टी२० सामना रविवारी (१४ जुलै) रंगणार आहे. हरारे येथे होत असेलेल्या टी२० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रियान पराग आणि मुकेश कुमारचे पुनरागमन झाले आहे. त्यांना ऋतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांच्या जागेवर संधी मिळाली आहे.

या सामन्यासाठी झिम्बाब्वेने देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. झिम्बाब्वेने ब्रँडन मावुताला संधी दिली असून तेंडाई चताराला विश्रांती देण्यात आली आहे.

Team India
IND vs ZIM, T20I: झिम्बाब्वेवरील विजय टीम इंडियासाठी ठरला ऐतिहासिक, आजपर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम केला नावावर

झिम्बाब्वेसाठी महत्त्वाचा सामना

झिम्बाब्वेचा हा १५० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आहे. त्यामुळे १५० टी२० सामने खेळणारा झिम्बाब्वे ११ वा संघ ठरला आहे.

तसेच या मालिकेबद्दल सांगायचे झाले, तर भारताने पहिला सामना पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतरच्या तीनही सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेतील विजय निश्चित केला आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यातील निकालाने मालिकेच्या निकालावर बदल होणार नाही. मात्र, या मालिकेचा शेवट विजयाने गोड करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.

Team India
IND vs ZIM: जयस्वाल-गिलने उडवला झिम्बाब्वेच्या गोलंदाजीचा धुव्वा, भारताने दणदणीत विजयासह मालिकाही घातली खिशात

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार

झिम्बाब्वे : वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), ब्रँडन मावुता, रिचर्ड एनगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com