28 Four, 18 Sixes! झिम्बाब्वेने T20 मध्ये ठोकल्या तब्बल २८६ धावा! भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

zimbabwe vs seychelles : झिम्बाब्वेने सेशल्सविरूद्ध २८७ धावा करून ट्वेंटी-२० क्रिकेटमधील तिसऱ्या सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला.
seychelles vs zimbabwe
seychelles vs zimbabweesakal
Updated on

T20 Highest Score: झिम्बाब्वे क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० मध्ये इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेने सेशेल्सविरूद्ध काल ट्वेंटी-२० मध्ये तिसरी सर्वाधिक धावसंख्या उभारली. नुकत्याच झालेल्या भारत बांगलादेश ट्वेंटी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने बांगलादेशविरूद्ध २९७ धावा केल्या व ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारत दुसरा संघ ठरला. तर झिम्बाब्वेने २८ चौकार १८ षटकारांतच्या मदतीने सेशेल्सविरूद्ध २८७ धावा करून ट्वेंटी-२० सर्वाधिक धावांच्या यादित तिसरे स्थान मिळवले आहे.

सेशेल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वेने सामन्याची सुरूवात स्पोटक फलंदाजीने केली. ब्रायन बेनेट व तडिवानाशे मरुमणीने पहिल्या विकेटसाठी तब्बल १४२ धावांची भागिदारी केली. पण, दहाव्या षटकात मरुमणी झेलबाद होवून परतला आणि भागिदारी तुटली. मरुमणीने १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ३७ चेंडूत ८६ धावा केल्या. त्यानंतर १३ व्या षटकात ब्रायन बेनेट माघारी परतला आणि ९ धावांनी त्याचे शतक हुकले. त्यानंतरच्या फलंदाजांनी फटकेबाजी सुरूच ठेवली आणि २० षटकांच्या अखेरीस झिम्बाब्वे २८६ धांचा टप्पा गाठला.

seychelles vs zimbabwe
IND vs PAK: भारतासमोर शेजाऱ्यांची शरणागती; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मिळवला विजय

२८७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सेशेल्स संघाची सुरूवात खराब झाली. सेशेल्स ६ षटकांमध्ये २ विकेट्स गमावत केवळ १८ धावा केल्या. ७व्या षटकात पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार झिम्बाब्वे संघाला ७६ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम नेपाळच्या नावावर आहे. २०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळने मंगोलियाविरुद्ध २० षटकात ३१४ धावा केल्या होत्या. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० धावांचा टप्पा पार करणारा नेपाळ हा एकमेव संघ आहे. या यादीत भारत २९६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

seychelles vs zimbabwe
IND vs NZ, Test: न्यूझीलंडने बंगळुरूचं मैदान जिंकलं! तब्बल ३६ वर्षांनी भारताला मायदेशात हरवलं

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ

३१४- नेपाळ ( विरुद्ध मंगोलिया) २०२३

२९७- भारत (विरुद्ध बांगलादेश) २०२४

२८६- झिम्बाब्वे (विरुद्ध सेशेल्स) २०२४

२७८- अफगाणिस्तान (विरुद्ध आयर्लंड) २०१९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.