David Miller : क्रिकेटर डेव्हिड मिलरने गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिसशी केलं लग्न; Photo Viral

david miller marriage : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरने लग्न केलं आहे. त्याची गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिससोबत तो लग्नबंधना अडकला. केपटाऊनमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला.
David Miller
David Milleresakal
Updated on

david miller marriage : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरने लग्न केलं आहे. त्याची गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिससोबत तो लग्नबंधना अडकला. केपटाऊनमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला.

एका सुंदर आणि आटोपशीर सोहळ्यात दोघांनी लग्न केलं आहे. त्याच्या जगभरातील चाहत्यांनी दोघांचे फोटो व्हायरल केले आहेत. या लग्नाबद्दल स्वतः कॅमिलाने घोषणा केली. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.

केपटाऊनमध्ये एका देखण्या सोहळ्यामध्ये दोघांनी एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली. लग्नसोहळ्यासाठी काही विशेष लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं.

डेव्हिड मिलर हा त्याच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघाचं प्रतिनिधीत्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि इंडियन प्रिमियर लीगमध्ये दमदार कामगिरी केली होती. २०२२ च्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सच्या विजयात डेव्हिडचा मोठं योगदान होतं.

जगभरात डेव्हिड मिलरच्या कामगिरीचं नेहमीच कौतुक झालेलं आहे. आता कॅमिलसोबत त्याने लग्न केल्याने वैयक्तिक जीवनातील एक मोठा टप्पा सर केल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मागच्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी दोघांनी इन्स्टाग्रामवर काही विशेष क्षण शेअर केले होते. कॅमिला मिलरने त्याला त्यावेळी प्रेमासाठी हो म्हटलं होतं.

जगभरातील क्रिकेटर्स आणि क्रिकेट रसिकांनी दोघांच्या भावी वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्यभर प्रेमाने आणि आनंदाने जगा, अशा शुभेच्छा चाहते देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.