ई-पास शिवाय पृथ्वीची भटकंती; पोलिसांनी दाखवला खाक्या

ई पास नसल्याने पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.
prithvi shaw
prithvi shaw e sakal
Updated on

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विनाकारण प्रवास करण्यावर बंदी असताना भारतीय संघाचा युवा क्रिकेटर कोणत्याही परवानगीशिवाय गोव्याला जाताना समोर आले आहे. कोणत्याही प्रकारचा ई पास नसताना प्रवास करताना आढळल्याने पोलिसांनी त्याला रोखले. मुंबईहून कोल्हापूर मार्गे तो गोव्याला जात होता. आंबोली येथे पोलिसांनी त्याची कार अडवली. त्याच्याकडे ई पास नसल्याने पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. यासर्व प्रकारानंतर त्याने ऑनलाइन पास काढून तो पोलिसांना दाखवला आणि मग पोलिसांनी त्याला गोव्याकडे जाण्यास परवानगी दिली. ( Prithvi Shaw Car Stopped In Amboli Without E Pass )

prithvi shaw
'मूर्ती लहान पण कीर्ती महान',पाहा शफालीचे खास फोटो

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू आहे. अनावश्यक प्रवासावर बंदी असताना भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ काही मित्रांसोबत मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याकडे जाताना दिसून आले. गुरुवारी सकाळी 11. 30 दरम्यान आंबोली परिक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आरोग्य विभागाने पृथ्वीसह त्याच्या सहकाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळी पृथ्वीकडे ई पास मागितला त्यावेळी त्याच्याकडे ई-पास नसल्याचे समोर आले. ई पास दाखवल्याशिवाय पुढे प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे पोलिसांनी त्याला सुनावले.

prithvi shaw
प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला कमिन्सकडून 1 कोटी डॉलरचं गिफ्ट

त्यामुळे नियमानुसार पृथ्वी शॉने आंबोली येथूनच ऑनलाइन पद्धतीने ई-पाससाठी अर्ज करावा लागला. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास तासभर लागला. तेवढा वेळ त्याला पोलिसांनी थांबवून ठेवले. नियम सर्वांना सारखाच आहे, हेच पोलिसांनी दाखवून दिले. ई पास दाखवून पृथ्वी गोव्याच्या दिशेने निघून गेला. ई-पासशिवाय नियमबाह्य प्रवास करुन गोव्याला भटकंती करणे पृथ्वीला आता चांगलेच लक्षात राहिल. पण मुंबईपासून आंबोलीपर्यंत कोणीही त्याला ई-पास विचारला नाही का? असा प्रश्नही उपस्थिती होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.