Euro Cup 2020 : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (cristiano ronaldo) युरो स्पर्धेतील पहिल्या मॅचपूर्वी प्रेस कॉन्फरन्समधील एका घटनेमुळे चर्चेत आलाय. पोर्तुगाल आणि हंगेरी यांच्यातील सामन्यापूर्वी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सवेळी रोनाल्डोने जे कृत्य केले ते सॉफ्ट ड्रिंक कंपनीला गोत्यात आणणारे असे आहे. सामन्यापूर्वी रोनाल्ड ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्ससाठी आला त्यावेळी टेबलवर ठेवलेल्या कोका कोला ब्रँडच्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या त्याने बाजूला सरकवल्या. एवढे करुन न थांबता त्याने पाण्याची बाटल दाखवली. (cristiano-ronaldo-asks-fans-to-drink-water-instead-soft-drinks-like-coca-cola-video-goes-viral)
स्वत: फिटनेसवर भर देणाऱ्या रोनाल्डोने सॉफ्ट ड्रिंकपेक्षा पाणी प्या! असाच काहीसा सल्ला आपल्या चाहत्यांना दिलाय. टेबलावरील सॉफ्ट ड्रिंकची बाटली हटवून पाण्याची बाटली दाखवणारा रोनाल्डोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युरो चषकातील गत विजेता स्पर्धेतील पहिला सामना हंगेरी विरुद्ध खेळणार आहे. रोनाल्डो शिवाय फर्नांडो संतोस, अँड्रे सिल्वा आणि डिआगो यांच्यावर पोर्तुगालची मदार आहे. सलामीच्या लढतीपूर्वी रोनाल्डो म्हणाला की, ही लढत संघर्षमयी होईल. आम्ही सकारात्मक विचाराने खेळू. सामन्यात गोल करणे नेहमीच आनंदाचा क्षण असतो, असे सांगत सलामीच्या सामन्यात योगदान देण्यास उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.