Cristiano Ronaldo: रोनाल्डोने संपवला ट्रॉफीचा दुष्काळ! अल नासरने पहिल्यांदाच पटकावले अरब क्लब चॅम्पियन्स कपचे विजेतेपद

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo
Updated on

Cristiano Ronaldo Al-Nassr FC : फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियाच्या अल-नासर या क्लबशी जोडला गेला होता. विश्वचषकादरम्यानच मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

सौदी अरेबियात रोनाल्डोचे पदार्पण काही खास नव्हते पण हळूहळू तो त्यांच्या लयीत परतला. आता स्वबळावर 9 खेळाडूंसह खेळणाऱ्या रोनाल्डोने अल नासरला अरब क्लब चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून दिले आहे. रोनाल्डोने दोन वर्षांनंतर ट्रॉफी जिंकली आहे. शेवटच्या वेळी त्याने 2021 मध्ये इटालियन क्लब जुव्हेंटससाठी कोपा इटालिया जिंकला होता.

Cristiano Ronaldo
WI vs IND : 'अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना', विजयानंतर KL राहुल अन् इशान किशनवर मीम्स व्हायरल

अल नासरने हा सामना 2-1 असा जिंकला आणि दोन्ही गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोने केले. विजेतेपदाच्या लढतीत संघाचा सामना अल हिलालशी झाला. 51व्या मिनिटाला मायकलच्या गोलने अल हिलालला आघाडी मिळवून दिली. 71व्या मिनिटाला अब्दुल्लाह अल आमरीला रेड कार्ड दाखविल्यानंतर अल नासरची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मात्र तीन मिनिटांनी रोनाल्डोने गोल केला. संघाचा आणखी एक खेळाडू नवाद बुशाल यालाही 78 व्या मिनिटाला लाल कार्ड मिळाले. आता अल नासरचे मैदानावर फक्त 9 खेळाडू होते.

Cristiano Ronaldo
WI vs IND: 'हार्दिक भाऊ ज्या प्रकारे...', यशस्वी जैस्वालने कॅप्टन पांड्याबद्दल केले मोठे वक्तव्य

निर्धारित 90 मिनिटांनंतर दोन्ही संघाचा स्कोअर 1-1 अशा होता. मग गेम अॅस्ट्रा टाईमवर गेला. 98व्या मिनिटाला रोनाल्डोची जादू पुन्हा एकदा कामी आली. 9 खेळाडूंसह खेळताना त्याने एक गोल करून आपल्या संघाला 2-1 ने आघाडीवर नेले. 115व्या मिनिटाला दुखापतीमुळे रोनाल्डोला मैदान सोडावे लागले. अल हिलालने सर्वतोपरी प्रयत्न केले पण गोल करू शकला नाही. अशाप्रकारे रोनाल्डोने अल नासरसाठी पहिली ट्रॉफी जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.