Cristiano Ronaldo YouTube: एका दिवसात 16m Subscribers; यूट्यूबवर आर्थिक भार, जाणून घ्या फुटबॉलपटूला किती पैसे द्यावे लागणार

Cristiano Ronaldo YouTube Income: दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सोशल मीडियाला हादरवून टाकले आहे. रोनाल्डोने मंगळवारी सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी यूट्यूब चॅनेल सुरू करत असल्याची घोषणा केली अन् तासाभरात नेटिझन्सनी धुमाकूळ घातला.
Cristiano Ronaldo YouTube
Cristiano Ronaldo YouTubeesakal
Updated on

Cristiano Ronaldo 'UR Cristiano' YouTube Earning: पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने कालपासून सोशल मीडियावर हवा केली आहे. रोनाल्डोने त्याच्या सोशल मीडियावर एक घोषणा केली अन् त्याचे चाहते सैराट झाले... यूट्यूब चॅनेल आणत असल्याची ही घोषणा होती आणि चाहत्यांनी खटाखट CR7 चे चॅनल सबस्क्राईब केले. त्याच्या चॅनेलने अवघ्या काही तासात १० मिलियन सबस्क्राईब्सचा टप्पा ओलांडला आणि यूट्यूबचं टेंशन वाढलं.. आता आज दुपारी अडीच वाजेपर्यंत रोनाल्डोच्या चॅनेलचे सबस्क्राईबर १५ मिलियनच्या वर गेले आहेत.

रोनाल्डोचा जगभरात डंका...

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहेत आणि त्यामुळेच सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्ममध्ये त्याचा डंका पाहायला मिळतो. जगातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या रोनाल्डोचे इंस्टाग्राम, X आणि फेसबूकवर सर्वाधिक चाहते आहेत. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमागे रोनाल्डो सर्वाधिक २६ कोटी रुपये कमवत असल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता.

यूट्यूबचं टेंशन वाढलं...

३९ वर्षीय रोनाल्डोने काल यूट्यूब चॅनेल सुरू करत असल्याचे जाहीर केले आणि त्याच्या चॅनेलचे सबस्क्राईबर्स १५ मिलियनच्या वर गेले आहेत. पाच वेळच्या बॅलोन डी ओर पुरस्कार विजेत्या रोनाल्डोची लोकप्रियता जगभरातत आहे आणि त्यामुळेच त्याने हा यूट्यूब चॅनेलचा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केला आहे. पण, आता यूट्यूबचे टेंशन वाढले आहे. 'UR Cristiano' या चॅनेलसाठी यूट्यूबला आता कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत.

यूट्यूब चॅनेलमधून रोनाल्डो किती कमावणार?

रोनाल्डो यूट्यूब चॅनेलमधून मिलियन्समध्ये कमावणार आहे. Thinkfic ने दिलेल्या वृत्तानुसार यूट्यूब १००० व्ह्यूजला २ ते १२ डॉलर एवढे क्रिएटरला देते. जाहिरातींचा दर वेगळा... १००० व्ह्यूज झाल्यानंतर जाहीराती येतात आणि त्यातील ४५ टक्के हिस्सा यूट्यूब ठेवतो व उर्वरित ५५ टक्के क्रिएटरला दिले जातात.

रोनाल्डोने त्याच्या चॅनेलवर १९ व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि आताच ते कोट्यवधी व्ह्यूजमध्ये गेले आहेत. त्यामुळे रोनाल्डोच्या 'UR Cristiano' चॅनेलमुळे युट्यूबला फायदाही होणार आणि हात मोकळे करून जास्तीचे पैसेही फुटबॉलपटूला द्यावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.