Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा धक्कादायक खुलासा; मँचेस्टर युनायटेडने धोका दिला

Cristiano Ronaldo Erik ten Hag
Cristiano Ronaldo Erik ten Hagesakal
Updated on

Cristiano Ronaldo Erik ten Hag : कतार येथे फिफा वर्ल्डकप 2022 अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहे. अनेक देश आपला संघ जाहीर करत आहेत. मात्र क्लब फुटबॉलमधील वाद काही पाठ सोडत नाहीयेत. नुकतेच पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने एक स्फोटक मुलाखत दिली. यात मुलाखतीत त्याने मँचेस्टर युनायटेडने धोका दिल्याचा आरोप केला. ख्रिस्तीयानो रोनाल्डोने क्लबचे व्यवस्थापक एरिक टेन हॅग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माला जबरदस्तीने क्लबमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असा दवा केला आहे.

Cristiano Ronaldo Erik ten Hag
David Warner : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटला करणार अलविदा ?

जेव्हाबासून हॅन यांनी मँचेस्टर युनायटेडची सूत्रे हातात घेतली आहे तेव्हापासून पाचवेळा बॅलन डी'ऑर पुरस्काराचा मानकरी ठरलेला रोनाल्डो हा चर्चाचा विषय ठरला आहे. महिन्याभरापूर्वी रोनाल्डोला शिस्तभंगाबाबतची ताकीद देण्यात आली होती. त्याने टोटेनहॅमविरूद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात जाण्यास नकार दिला होता. गेल्या आठवड्यात रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडचे नेतृत्व केले मात्र संघ 3 - 1 असा पराभूत झाला.

रविवारी झालेल्या सामन्यात युनायटेडने फुलहामवर 2 - 1 असा विजय मिळवला. मात्र यावेळी रोनाल्डो गैरहजर होता. आता वर्ल्डकपसाठी सहा आठवड्यांचा ब्रेक घेतला आहे. दरम्यान, रोनाल्डोने एका टीव्ही शोमध्ये सांगितले की, 'माझ्या मनात टॅन हँगविषयी आदर नाही कारण तो मला आदर देत नाही. फक्त प्रशिक्षक नाही तर क्लबमधील इतर दोघं तिघं देखील असंच वागतात. माझ्या मनात धोका दिल्याची भावना निर्माण झाली आहे.'

क्लबमधून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल रोनाल्डोला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, 'होय माझ्या मनात धोका दिल्याची भावना निर्माण झाली आहे. मला असे वाटते की काही लोकांनी मी इथं नकोय. हे याचवर्षी झालयं असं नाही तर गेल्या वर्षी देखील असंच होतं.' रोनाल्डो ऑगस्ट 2021 मध्ये ज्युवेंटसमधून मँचेस्टर युनायटेडमध्ये परतला होता.

Cristiano Ronaldo Erik ten Hag
Shahid Afridi : शोएब अख्तर अन् मोहम्मद शमीच्या बाऊन्सर भांडणात आफ्रिदीने घेतली उडी, म्हणतो...

अॅलेक्स फर्ग्युसन असताना युनायटेडकडून रोनाल्डो जबरदस्त कामगिरी करत होता. त्यावेळी क्लबने तीन प्रीमियर लीग टायटल जिंकले होते. याचबरोबर चॅम्पियन्स लीग आणि रोनाल्डोने पहिला बॅलन डी'ऑर पुरस्कार देखील जिंकला होता. रोनाल्डोने गेल्या हंगामात 24 गोल करून देखील मँचेस्टर युनायटेडला चॅम्पियन्स लीगची पात्रता फेरी पार करता आली नव्हती. रोनाल्डो म्हणाला की, जेव्हापासून सर अॅलेक्स यांनी क्लब सोडला आहे मला क्लबमध्ये कोणताही विकास झालेला दिसत नाहीये. काही बदलले नाही. क्लबचं चांगलं व्हाव असं मला वाटतं. म्हणूनच मी मँचेस्टर युनायटेडमध्ये आलो होतो.'

रोनाल्डो पुढे म्हणाला की, 'मात्र क्लबमध्ये अंतर्गत काही बाबी आहेत ज्यामुळे क्लब मँचेस्टर सिटीसारखा टॉप लेव्हलवर पोहचू शकत नाहीये. लीव्हरपूल आणि आता अर्सेनाल देखील बघा. मँचेस्टर युनायटेड पहिल्या तीन क्लबमध्ये सामील असला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ते होत नाहीये.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()