Cristiano Ronaldo : 165 कोटी रूपये विसरा! करार संपवल्यानंतर मँचेस्टरचा रोनाल्डोला ठेंगा

Cristiano Ronaldo Manchester United Contract Termination
Cristiano Ronaldo Manchester United Contract Terminationesakal
Updated on

Cristiano Ronaldo Manchester United Contract Termination : सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून गणल्या गेलेला ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार सामंज्यस्याने संपवला. ब्रिटीश पत्रकार मॉर्गन यांना दिलेल्या विस्फोटक मुलाखतीनंतर मँचेस्टरने रोनाल्डोसोबतचा करार संपवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे रोनाल्डोच्या भविष्यावर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, आता रोनाल्डो आणि मँचेस्टर यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर अजून एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे रोनाल्डोला 17 मिलियन ग्रेट ब्रिटन पाऊंड्सवर (जवळपास 165 कोटी रूपयांपेक्षा जास्त) पाणी सोडावे लागणार आहे.

Cristiano Ronaldo Manchester United Contract Termination
FIFA World Cup 2022 : उपविजेत्यांची पाटी कोरीच; मोरॉक्कोविरूद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत

सहसा करार रद्द केल्यानंतर खेळाडूला क्लबकडून कॉम्पेंनसेशन रक्कम मिळते. मात्र रोनाल्डोच्या प्रकरणात असे काही होणार नसल्याचे दिसत आहे. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार मँचेस्टर युनायटेडचे मालक रोनाल्डोला कोणताही रक्कम अदा करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यांच्या मते रोनाल्डोने कराराचा भंग केल्याने त्याला कोणताही रक्कम मिळणार नाहीये.

टेलिग्राफच्या वृत्तात मँचेस्टर युनायटेडचे सीईओ रिचर्ड ऑर्नोल्ड आणि रोनाल्डोचे एजंट जॉर्ज मेंडीस तसेच दोन्ही पार्टींचे वकील यांनी याबाबत चर्चा केली आहे. यावेळी रोनाल्डोला कोणतीही रक्कम देण्यात येणार नाही असे ठरले. या प्रकरणार युनायटेडचे पारडे जड होते. कारण नुकतचे रोनाल्डोने जाहीररित्या क्लबवर टीका केली होती. याचबरोबर प्रीमियर लीगच्या टॉटेनहम हॉस्टप्युर विरूद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात येण्यास देखील नकार दिला होता. या गोष्टी रोनाल्डोच्या विरूद्ध गेल्या.

Cristiano Ronaldo Manchester United Contract Termination
FIFA World Cup 2022 : कतारमधील वर्ल्डकपसाठी Adidas ने तयार केलेला 'अल रिहला' बॉल आहे खूप खास

रोनाल्डोचा फ्युचर प्लॅन काय?

रोनाल्डोने जाहीररित्या मँचेस्टर युनायटेडविरूद्ध पंगा घेण्यापूर्वी अनेक क्लबमध्ये ट्रान्सफरसाठी हातपाय मारले होते. मात्र आघाडीचे इंग्लिश आणि युरोपियन क्लबनी याबाबत जास्त उत्सुकता दाखवली नव्हती. आता तर रोनाल्डोने आक्रमक भुमिका घेत क्लबविरूद्ध जाहीररित्या टीका केल्याने त्याचा मार्ग अजून खडतर झाला आहे. पाचवेळा बॅलोन डेओर पुरस्कार जिंकलेल्या रोनाल्डोच्या नावावर 700 क्लब गोल आहेत. दरम्यान, अशी माहिती मिळत आहे की रोनाल्डोची बायरेन म्युनिच क्लबशी बोलणी सुरू असून तो युवा असताना याच क्लबमधून पुढे आला होता.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()