Cristiano Ronaldo In WWE : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल - नासरकडून खेळत आहे. सौदी प्रो लीग खेळणारा रोनाल्डो सौदीमध्ये चांगलाच रमलेला दिसतोय. मात्र मिळालेल्या माहितीनुसार रोनाल्डो फुटबॉलच्या मैदनानंतर आता WWE च्या आखाड्यात देखील दिसणार आहे.
थांबा तुम्ही विचार करत असाल की रोनाल्डो आता WWE रेसलर होणार की काय? नाही तरो WWE मध्ये रेसलर म्हणून नाही तर पाहुणा म्हणून सहभागी होणार आहे. सौदी अरेबियात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या क्राऊन ज्वेल इव्हेंटसाठी रोनाल्डोला पाहुणा म्हणून बोलावण्याचं प्लॅनिंग WWE करत आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
रोनाल्डो जेव्हापासून अल नासरकडून खेळायला लागला आहे तेव्हापासून सौदी अरेबिया क्रीडा जगतात एका वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे. डिसेंबर 2022 मध्ये 215 मिलियन युएस डॉलरची डील पदरात पाडून रोनाल्डो अल नासरवासी झाली होती. तेव्हाबासून अल नासरला फुटबॉल जगतात चर्चेत ठेवण्यात रोनाल्डो यशस्वी ठला आहे.
रोनाल्डो आल्यापासून पेक्षक संख्या, चाहत्यांची फुटबॉलमधील रूची, सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी, सौदी फुटबॉल यांची वाढ होताना दिसत आहे. आता WWE देखील या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी धडपडत आहे. रोनाल्डोच्या क्रेजचा फायदा त्यांच्या क्राऊन ज्वेल इव्हेंटसाटी करून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
स्पॅनिश वृत्तसंस्था एएसने दिलेल्या माहितीनुसार, WWE चे नवे मालक एन्डेव्होर हे क्राऊन ज्वेलच्या नफ्यात आणि संभाव्य उत्पन्नात वाढ करू इच्छितात. त्यासाठी त्यांनी रोनाल्डोचा मार्केटिंगसाठी वापर करण्याचे ठरवले आहे. मात्र यासाठी त्यांना रोनाल्डोला तितकीच आकर्षक डील देखील द्यावी लागेल.
रोनाल्डो WWE मध्ये येण्यासाठी त्याला मोठ्ठी रक्कम द्यावी लागणार आहे. WWE ने सौदी अरेबियात यापूर्वी 4 क्राऊन ज्वेल इव्हेंट आयोजित केले आहेत. त्यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा या इव्हेंटचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये नाईट ऑफ चॅम्पियन्स हा इव्हेंट देखील केला होता.
ज्यावेळी अल नासरचा संघ तेहरानमध्ये पोहचला होता. त्यावेळी इराणच्या चाहत्यांनी त्याचे जबरदस्त स्वागत केलं होतं. रोनाल्डो एएफसी चॅम्पियन्स लीगच्या ग्रुप इ मधील सामन्यासाठी इराणला गेला होता. रोनाल्डो जेथे जातो तेथे चाहते प्रचंड संख्येने उपस्थित राहून त्याचे स्वागत करत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.