Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगाल युरो कप 2024 मधील आपली मोहीम गुरूवापासून सुरू करणार आहे. त्यांचा पहिला सामना हा चेक रिपब्लिकसोबत होत आहे. पोर्तुगालसाठी सर्वात महत्वाचा खेळाडू हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. तो पोर्तुगालच्या आक्रमण फळीचं नेतृत्व करेल. युरो कपमध्ये सर्वाधिक लक्ष असलेल्या खेळाडूंमध्ये 39 वर्षाच्या रोनाल्डोचे नाव अव्वल स्थानावर आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगासाठी 2016 मध्ये युरो कप जिंकला होता. हा युरो कप फ्रान्समध्ये झाला होता. आता रोनाल्डोच्या ट्रॉफी केसमध्ये फक्त एकच ट्रॉफी मिसिंग आहे. त्याला अजून वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले त्यावेळी रोनाल्डो 37 वर्षाचा होता. तो पुढचा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.
रोनाल्डो आपलं स्वप्न अर्धवट सोडण्यास तयार नाही. तो हार मानण्यास तयार नाही. रिलेव्होच्या माहितीनुसार तो 2026 चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च स्तरावर फुटबॉल खेळत राहणार आहे. 2026 च्या वर्ल्डकपमध्ये रोनाल्डो हा 41 वर्षांचा होईल. तो सहाव्यांदा वर्ल्डकपमध्ये सहभागी होईल. त्याने 2006 च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा पोर्तुगालचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानं वर्ल्डकपमध्ये 22 सामने खेळले असून 8 गोल केले आहेत.
रोनाल्डोचे फुटबॉलप्रती समर्पण हे सर्वांना माहिती आहे. आता रोनाल्डोचे चाहते आणि टीकाकार देखील तो युरो कपमध्ये कशी कामगिरी करतो याकडे लक्ष ठेवून असणार आहेत. त्याने युरो कपमध्ये भरीव कामगिरी केली नाही तरी त्याचं मुख्य लक्ष्य हे वर्ल्डकप जिंकणे हेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.