रोनाल्डो पुन्हा 'मँचेस्टर युनायटेड'मध्ये; युव्हेंटसला सोडचिठ्ठी

Ronaldo
Ronaldo
Updated on

English Premier League: अवघ्या तीन वर्षात करार संपुष्टात

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) इंग्लिश प्रीमिअर लीग (EPL) स्पर्धेतील मँचेस्टर सिटी (Manchester City) क्लबसोबत करारबद्ध (Contract) होणार अशा चर्चा (Gossips) काही दिवस रंगल्या होत्या. पण रोनाल्डोने मात्र आपला जुना क्लब असलेल्या मँचेस्टर युनायटेडला (Manchester United) पसंती दर्शवली. शुक्रवारी इटालियन क्लब युव्हेंटसला (Juventus) अवघ्या तीन वर्षात सोडचिठ्ठी देत रोनाल्डोने मँचेस्टर युनाटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. मँचेस्टर युनायटेडने या संदर्भातील (Tweet) माहिती दिली.

रोनाल्डोने २००३ ते २००९ दरम्यान मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी त्याने २९२ सामन्यांमध्ये ११८ गोल केले होते. शुक्रवारी त्याने आपला युव्हेंटसमधील करार संपवला. त्यानंतर रोनाल्डो कोणत्या क्लबला पसंती देणार याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष होते. मँचेस्टर सिटी क्लब रोनाल्डो करारबद्ध करण्यास उत्सुक असल्याची चर्चा जोर धरत होती. त्याच वेळी मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनाने आपल्या अनुभवाचा कस लावत रोनाल्डोला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. रोनाल्डोने युव्हेंटसला निरोप देताना एक भावनिक पोस्ट लिहून करार संपवला.

मँचेस्टर युनायटेडने आपल्या ट्वीटमध्ये रोनाल्डोचे दमदार स्वागत केले. स्वगृही परतल्याबद्दल अभिनंदन! युव्हेंटस क्लबकडून खेळणारा रोनाल्डो आता आमच्या संघात खेळणार या भावनेचा आम्हाला आनंद आहे, असे त्यांनी ट्वीट केले. रोनाल्डोने २०१८ मध्ये ला लिगा क्लबसोबतचा रियल माद्रिदचा ९ वर्षांचा करार संपवून युव्हेंटसला पसंती दिली. तीन वर्षे युव्हेंटसकडून खेळताना त्याने १३४ सामन्यांत १०१ गोल केले. रियल माद्रिदला रोनाल्डोने चार वेळा चॅम्पियन्स लीग आणि दोन वेळा ला लिगाचे विजेतेपद मिळवून दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.