Cristiano Ronaldo On The Bench : फिफा वर्ल्डकप 2022 च्या राऊंड ऑफ 16 मध्ये स्वित्झर्लंडविरूद्धच्या सामन्यात पोर्तुगालचे कोच फर्नांडो सँटोस यांनी स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवर ठेवले होते. त्यानंतर फुटबॉल विश्वात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र आता क्वार्टर फायनलमध्येही सँटोस यांनी रोनाल्डोला बेंचवरच बवसवणे पसंत केले आहे. मोरोक्कोविरूद्धच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो बेंचवरून सामन्याची सुरूवात करणार आहे.
पाच वेळच्या बॅलोन डीओर पुरस्कार विजेत्या रोनाल्डोच्या जागी संघात रामोस सेंटर फॉरवर्डची भुमिका बजावणार आहे. तसेच पुढच्या फळीत ब्रुनो फर्नांडेस, बेर्नार्डो सिल्वा आणि जाओ फेलिक्स खेळणार आहेत. गेल्या स्वित्झर्लंडविरूद्धच्या संघात प्रशिक्षक सँटोस यांनी मडिफिल्डर विलियम्स कारवालहोच्या जागी रूबेन नेव्हेसला संधी दिली आहे. बाकीचा संघ त्यांनी तसाच ठेवला आहे.
फिफा वर्ल्डकप सुरू होत होता त्याचवेळी रोनाल्डोचं मँचेस्टर युनायटेड सोबत फाटलं. दरम्यान, रोनाल्डोने साखळी फेरीत पोर्तुगालचे नेतृत्व करतो होता. पोर्तुगालने साखळी फेरी पार करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. त्यांचा सामना स्वित्झर्लंडविरूद्ध झाला. या सामन्यात संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोलाच मॅनेजर फर्नांडो सँटोस यांना बेंचवर बसवले होते. पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा 6 - 1 असा पराभव केला. ख्रिस्तियानो रोनाल्डो या सामन्यात 73 व्या मिनिटाला फेलिक्सच्या जागी मैदानावर उतरला होता.
हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.