Croatia : क्रोएशिया देश छोटा, खेळात मोठा

जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपद
Croatia : क्रोएशिया देश छोटा, खेळात मोठा
Updated on

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सांघिक किंवा वैयक्तिक अशा कोणत्याही खेळात महासत्ता म्हणून यशाची सिद्धता केलेल्या देशांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे. ऑलिंपिकसारख्या पृथ्वीतलावरील सर्वोच्च क्रीडा महोत्सवापासून टेनिससारख्या खेळात महासत्ता मोजक्या आहेत.

अशावेळी 1991 मध्ये अस्तित्त्वात आलेला क्रोएशिया नियमाला अपवाद ठरला आहे. 4,105,267 इतकी लोकसंख्या आणि 21,851 चौरस मैल इतके क्षेत्रफळ असलेल्या क्रोएशियासारखा छोटा देश आपले अस्तित्त्व सातत्याने अधोरेखित करतो आहे.

जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपद आणि उपांत्य फेरी अशी कामगिरी क्रोएशियाने केली. डेव्हिस करंडक क्रमवारीत तर हा देश अव्वल आहे. रॅफेल नदाल याच्या स्पेनला मागे टाकून क्रोएशियाने अव्वल स्थान मिळविले आहे.

याच क्रोएशियाचा डेव्हिस करंडकात या देशाने 29 वर्षे सहभागी घेतला आहे. यातील 20 वर्षे त्यांनी जागतिक गटात स्थान राखले आहे. २००५ मध्ये मानांकन नसलेला पहिला विजेता बनण्याचा पराक्रम या देशाने केला. 2018 मध्ये दुसऱ्यांदा जेतेपद आणि 2021 मध्ये अंतिम फेरी अशी कामगिरी क्रोएशियाची आहे.

टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रोएशियाच्या मरीन चिलीच याला या यशाविषयी विचारले असता तो म्हणाला की, आमच्या देशबांधवांचे इतर खेळांमधील यश नेहमीच प्रेरक असते. आमचा फुटबॉलपटू ल्युका मॉड्रीच 37 वर्षांचा आहे आणि तो कमाल करतो आहे. जागतिक पातळीवरील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये त्याची गणना होते.

क्रोएशियाच्या क्रीडापटूंच्या दृष्टिनाबद्दल तो म्हणतो की, आम्ही फार चुरशीने खेळतो. आता माझेच बघा की मी कारकिर्दीच्या उत्तरार्धात उत्साह गमावलेला नाही. आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देतो आणि सर्वोत्तम कामगिरीला चालना देतो.

आता आपली कारकिर्दीतील दोनच वर्षे उरली आहेत असे मानत नाही. अजूनही भक्कम खेळ व्हावा म्हणून मी प्रयत्नशील असतो. चिलीच 34 वर्षांचा असून अमेरिकन जेतेपदासह ग्रँड स्लॅम विजेता आहे. क्रोएशियाच्या सर्वकालीन सर्वोत्तम क्रीडापटूंमधील त्याचे स्थान अढळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.