Luka Modric : आजोबांना मारलं, घर जाळलं; याच निर्वासित 'लुका'नं क्रोएशियाला सेमी फायनलपर्यंत आणलं

Luka Modric Story Of Croatia Captain
Luka Modric Story Of Croatia Captainesakal
Updated on

Luka Modric Story Of Croatia Captain : व्हेलेबिटच्या डोंगराळ भागात तशी मानवी वस्ती विरळच आहे. याच डोंगराळ भागात एक छत नसलेलं पडकं घर आहे. या घरात आता झाडी झुडपं उगवली आहेत. या घराकडे पाहून याला वर्षानुवर्षे कोणी वाली नसल्याचे लगेच कळते. या घरावरील युद्धाच्या खुणा येथील विध्वंसाची साक्ष देत असतात. हे भग्नअवस्थेतील घर आहे क्रोएशियाचा 37 वर्षाचा कर्णधार लुका मॉड्रिचचं!

लुका मॉड्रिचने बालपणातील काही क्षण या घरात घालवले आहेत. आता तिथे कोण रहात नाही मात्र हे पडकं घर लुकाची संघर्षमय कहानी सांगतं. ज्या आजोबांनी लुकाला त्याचं हे लुका नाव दिलं ते या घरात रहात होते. लुका मॉड्रिचचा 1985 मध्ये जन्म झाला. त्याने आपल्या आयुष्याची सुरूवातीची काही वर्षे या घरात घालवली. शेजारील झाटोन ओब्रोव्हास्की गावात देखील त्याचे वास्तव्य होते.

Luka Modric Story Of Croatia Captain
IPL Auction 2023 : आयपीएल लिलावाची फायनल लिस्ट जाहीर, 405 खेळाडूंचे देव पाण्यात

मात्र 1990 मध्ये क्रोएशियाच्या स्वातंत्र्य युद्धाला तोंड फुटले आणि लुकाचे सर्व आयुष्यच बदलून गेले. सर्बियाच्या लष्कराने लुकाच्या आजोबांना ठार मारलं. त्यांच घर जाळलं. त्यानंतर लुकाचे कुटुंब आपल्या घरापासून 40 किलोमिटर समुद्रकिनारी असलेल्या झादार शहरात विस्थापित म्हणून राहू लागलं. या शहरात विस्थापितांची राहण्याची सोय एका हॉटलमध्ये करण्यात आली. आता छोट्या लुकाचं हेच घर होतं.

प्रचंड कार्यरत राहणाऱ्या एका छोट्या मुलाने आपल्या फुटबॉल स्किल्सने या विस्थापितांच्या हॉटेलमधील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लुकाचे पहिले फुटबॉल प्रशिक्षक जॉसिप बाजलो सांगतात की, 'मी विस्थापितांच्या हॉटेलमध्ये एक प्रचंड अॅक्टिव्ह असणाऱ्या आणि फुटबॉल खेळणाऱ्या मुलाबद्दल ऐकलं होत. हा मुलगा हॉटेलच्या आवारात दिवसभर फुटबॉल खेळत असतो. हा मुलगा फुटबॉलसोबतच झोपतो.'

Luka Modric Story Of Croatia Captain
Anand Mahindra : केनच्या हुकलेल्या पेनाल्टीवर आनंद महिंद्रांचा प्रश्न, वेळेत उत्तर द्या अन् जिंका गाडी

ज्यावेळी बाजलो यांनी लुकाला फुटबॉल खेळताना प्रत्यक्ष पाहिलं त्यावेळी त्यांनी लगेच त्याला शाळेच्या फुटबॉल क्लबसाठी खेळण्याची ऑफर दिली. तेथे त्याने लगचे आपला प्रभाव पाडण्यास सुरूवात केली. एकीकडे फुटबॉलपटू म्हणून लुकाची जडणघडण होत होती. दुसरीकडे युद्धग्रस्त झादार शहरात सातत्याने बॉम्ब शेलिंग होत होते.

लुकाचा बालपणीचा मित्र मारिजान बुलजात सांगतो की, आम्ही फुटबॉलचा सराव करण्यासाठी गेलोय आणि बॉम्ब शेलिंग सुरू झालंय असं असंख्य वेळा असे झाले आहे. आम्ही सराव अर्धवट सोडून धावत पळत शेल्टर्समध्ये पोहचत होतो. मात्र याच वातावरणात क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचचे व्यक्तीमत्व घडवले आणि त्याला मानसिकदृष्ट्या कणखर बनवले.

Luka Modric Story Of Croatia Captain
Lionel Messi : कूल मेस्सी जेव्हा भडकतो... सामन्यात 16 पिवळे कार्ड दाखवणाऱ्या पंचाला FIFA ने पाठवले घरी

याच लुकाने 2018 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये क्रोएशियाला आपल्या नेतृत्वात अंतिम फेरीपर्यंत पोहचवले. त्यानंतर कतारमध्ये होत असलेल्या 2022 च्या वर्ल्डकपमध्ये त्याची खेळण्याची शाश्वती नव्हती. मात्र तो आपला शेवटचा वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि आपल्या कर्णधाराप्रमाणे झुंजार असलेल्या क्रोएशिया संघाने सेमी फायनलपर्यंत धडक मारली.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.