CSK ने डच्चू दिल्यानंतर नारायणने दिले सडेतोड उत्तर

N Jagadeesan & MS Dhoni
N Jagadeesan & MS Dhoniesakal
Updated on

चेन्नईच्या संघातून बाहेर काढलेल्या नारायण जगदीसनने कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला सडेतोड उत्तर दिले आहे. नुकतचं, आयपीएलच्या आगामी सीझनसाठी मिनी ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची जाहीर केली आहे. नारायण जगदीसन चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केले. आता याच खेळाडूनं द्विशतक झळकावत क्रिकेट जगतातून वाह वा sss मिळवली आहे. (CSK MS Dhoni N Jagadeesan becomes first player to smash five consecutive centuries in List A Cricket )

तामीळनाडू संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जगदीसनने आज अरुणाचल प्रदेशविरुद्धही शतकी खेळी केली. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात जगदीसनने ११४ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह द्विशतक झळकावले. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात पाच शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात जगदीसनवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

जगदीसन व्यतिरिक्त चेन्नईने इतर 7 खेळाडूंनाही रीलीज केले आहे. फ्रँचायझीने केएम आसिफ, अॅडम मिल्ने, ख्रिस जॉर्डन, रॉबिन उथप्पा, हरी निशांत, भगत वर्मा आणि ड्वेन ब्राव्हो यांना वगळले आहे. उथप्पा वगळता उर्वरित खेळाडू यंदाच्या मिनी मिनी लिलावाचा भाग असतील. अशा परिस्थितीत त्याच्या चमकदार कामगिरीमुळे जगदीशनवर पैशांचा पाऊस पडू शकतो. जगदीसनला आयपीएलमध्ये गेल्या चार वर्षांत फक्त 7 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.