ऋतुराज 10 महिन्यांनी धोनीच्या शॉकिंग निर्णयावर बोलला

याविषयावर धोनीशी बोलण्याचे धाडस झाले नाही, असे तो म्हणाला.
Ruturaj Gaikwad and Mahendra Singh Dhoni
Ruturaj Gaikwad and Mahendra Singh Dhoni File Photo
Updated on

भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएल स्थगित झाल्यानंतर कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सीएसकेने (CSK) चांगली कामगिरी केली असून ब्रेकनंतर युएईच्या मैदानात रंगणाऱ्या उर्वरित सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर उर्वरित सामने हे युएईच्या मैदानात खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. युएईत रंगणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून धोनी पुन्हा मैदानात उतरण्यासाठी अजून वेळ असला तरी सध्याच्या घडीला धोनीच्या निवृत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (CSK Opener Ruturaj Gaikwad On Mahendra Singh Dhoni Retirement Suddenly Someone Told Me Mahi Bhai Announced Retirement)

Ruturaj Gaikwad and Mahendra Singh Dhoni
गांगुली-कॉन्वे यांच्यातील योगायोगाचा कमालीचा चौकार

महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत त्याने सर्वांनाच धक्का दिला होता. ज्यावेळी त्याने निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी धोनी युएईत झालेल्या 13 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सामील झाला होता. धोनीच्या निवृत्तीसंदर्भात चेन्नईचा सुपर किंग्जचा ओपनर ऋतूराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने दहा महिन्यानंतर अनटोल्डवाली कहाणी सांगितली आहे. माही भाई आमच्यासोबत होता मात्र आम्हाला कोणालाही त्याच्या डोक्यात काय सुरुय याची कल्पना नव्हती, असे ऋतुराजने म्हटले आहे.

Ruturaj Gaikwad and Mahendra Singh Dhoni
French Open : जखमी वाघीणीनं रिटायर्ड हर्ट होत सोडली स्पर्धा

इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सलामीवीराने कॅप्टन कूल धोनीच्या निवृत्तीच्या त्या निर्णयावर भाष्य केले. ऋतुराज म्हणाला की, त्या दिवशी (15 ऑगस्ट 2020) दुबईला निघण्यापूर्वी चेन्नईमध्ये माही भाईसोबत 10-15 जण प्रॅक्टिस करत होतो. यातील कोणालाही धोनीने घेतलेल्या निर्णयाची कल्पना नव्हती. 15 ऑगस्टचा तो दिवस सामान्य दिवसांप्रमाणे होता. सीएसकेच्या ताफ्यात धोनीसोबत असलेल्या खेळाडूंनाही धोनीच्या निवृत्तीची बातमी ही सोशल मीडियावरुनच मिळाली. सायंकाळी साडेसहा वाजता प्रॅक्टिस संपली. 7 वाजता आम्ही सर्व माही भाईसोबत डिनर करत होता. त्यावेळी कोणीतरी इन्टाग्रामच्या माध्यमातून मला माही भाईने निवृत्तीची घोषणा केल्याची माहीत दिली. कोणतीही चर्चा नाही. कोणताही संकेत न देता धोनीने हा निर्णय घेतल्याचे ऋतूराजने सांगितले. धोनीने निवृत्ती घेतल्याचे समजल्यानंतही याविषयावर धोनीशी बोलण्याचे धाडस झाले नाही, असे तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.