सीएसकेचा 'थलायवा' चेन्नईत दाखल; ट्विटरवर धुमाकूळ

CSK Thalaiva MS Dhoni Reached Chennai Twitter Reacts Loudly
CSK Thalaiva MS Dhoni Reached Chennai Twitter Reacts Loudly esakal
Updated on

चेन्नई: आयपीएल मेगा लिलाव २०२२ (IPL Mega Auction 2022) फेब्रुवारीच्या १२ आणि १३ तारखेला होणार आहे. मात्र त्याआधीच आयपीएलचा फिव्हर सुरू झाला आहे. दरम्यान, गुरूवारी चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नईत दाखल झाला. धोनी चेन्नईत दाखल झाल्याचा फोटो ट्विटवर शेअर होताच त्यावर लाईक्स आणि रिट्विटचा पाऊस पडायला सुरूवात झाली. आयपीएलचा मेगा लिलाव काही आठवड्यातच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट जास्तच व्हायरल झाली. आतापर्यंत या पोस्टवर ३३ हजार लाईक्स आणि ३ हजाराच्या वर रिट्विट झाले आहेत. (CSK Thalaiva MS Dhoni Reached Chennai Twitter Reacts Loudly)

CSK Thalaiva MS Dhoni Reached Chennai Twitter Reacts Loudly
Video: ब्रेट ली म्हातारा झाला तरी ठरतोय 'इंडिया'ची डोकेदुखी

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपल्या चार खेळाडूंना रिटेन केले आहे. यात महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोईन अली (Moeen Ali) आणि ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) समावेश आहे. रविंद्र जडेजाला सिएसकेने १६ कोटी देऊन रिटेन केले आहे. तर महेंद्रसिंह धोनीला १२ कोटी, मोईन अली आणि ऋतुराज गायवाडला अनुक्रमे ८ कोटी आणि ६ कोटी रूपये देऊन रिटेन करण्यात आले आहे. चेन्नईने चार खेळाडू रिटने करण्यासाठी ४२ कोटी रूपये खर्च केले आहेत. त्यामुळे सीएसकेकडे मेगा लिलावादरम्यान (CSK Mega Auction) आता ४८ कोटी रूपये शिल्लक असणार आहेत.

CSK Thalaiva MS Dhoni Reached Chennai Twitter Reacts Loudly
Australian Open: राफा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; फायनलमध्ये केला प्रवेश

महेंद्रसिंह धोनी बऱ्याच वर्षापासून चेन्नई सुपर किंग्जची लिलावाची रणनिती ठरवत आला आहे. चेन्नईने आतापर्यंत चार आयपीएल विजेतेपदं (IPL Title) पटकावली आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपले गतविजेतेपद टिवकण्यासाठी खेळेल. यंदाच्या आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश असणार आहे. याच लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि अहमदाबाद असे दोन नवे संघ असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.