Cricket Competition : पहिल्या डावाच्या अधिक्यावर महाराष्ट्र संघाला तीन गुण

कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात मिळविलेल्या १६३ धावांच्या आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राने आसाम संघाविरुद्धच्या अनिर्णित सामन्यात तीन गुण मिळविले.
Cricket
Cricketsakal
Updated on

पुणे - कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात मिळविलेल्या १६३ धावांच्या आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राने आसाम संघाविरुद्धच्या अनिर्णित सामन्यात तीन गुण मिळविले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील मैदानावर झालेल्या या चारदिवसीय सामन्यात आसामच्या पहिल्या डावातील ३९६ धावांस उत्तर देताना महाराष्ट्राने कालच्या सात बाद ५५९ धावांवर डाव घोषित केला त्यानंतर खेळ थांबेपर्यंत आसाम संघाने दुसऱ्या डावात १ बाद २२८ धावांची मजल मारली होती. सलामीचा फलंदाज परवेझ मुशर्रफने १०४ धावांची खेळी केली. प्रद्युन साकियाने ७१ धावा केल्या.

या सलामीच्या जोडीने १५२ धावांची भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा मुशर्रफ १०४, तर रोशन टोपनो ३४ धावांवर नाबाद राहिले. महाराष्ट्राचे तीन सामन्यातून केवळ पाच गुण झाले असून त्यांचा चौथा सामना २८ ते ३१ जानेवारी दरम्यान झारखंड संघाबरोबर होत आहे.

धावफलक - आसाम : पहिला डाव - (१३८.२ षटकांत) सर्वबाद ३९६ व दुसरा डाव - १ बाद २२८ (परवेझ मुशर्रफ १०४, प्रद्युन साकिया ७१) अनिर्णित विरुद्ध महाराष्ट्र - पहिला डाव - (११७ षटकांत) ७ बाद ५५९ (कौशल तांबे २६१, विकी ओस्तवाल १४५, साहिल चुरी नाबाद ५७, अब्दूल कुरेशी ३-१०१, भार्गव लाहकर २-१४३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.