पहिल्या वनडेत भारतीय संघात दुफळी, माजी पाक खेळाडूचा दावा

Indian Dressing Room Divided during 1st ODI
Indian Dressing Room Divided during 1st ODI esakal
Updated on

पार्ल: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) टी २०, एकदिवसीय पाठोपाठ कसोटीचे नेतृत्वही सोडले. विराट आता संघात वरिष्ठ खेळाडूच्या भुमिकेतच असणार आहे. आफ्रिकेविरुद्धची पहिली वनडे (1st ODI) या भुमिकेतला त्याचा पहिला सामना होता. त्यामुळे हा बदलाला भारतीय संघ कसा समोरा जातो याची उत्सुकता होती. मात्र भारताने पहिलाच सामना गमावल्यामुळे तो आता मालिकेत पिछाडीवर पडला आहे. (Danish Kaneria says Indian Dressing Room Divided during 1st ODI Against South Africa)

Indian Dressing Room Divided during 1st ODI
गांगुली विराटला पाठवणार होते कारणे दाखवा नोटीस?

दरम्यान, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) एक खळबळजनक दावा केला. त्याने सांगितले की भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दोन गट पडल्याचे जाणवत होते. सामन्यादरम्यान विराटमध्ये उत्साह नव्हता. कर्णधारपद सोडल्याचा परिणाम त्याच्या बॉडी लँग्वेजवर दिसत होता. दानिश कनेरियाने ही निरिक्षणे आपल्या यू ट्यूब चॅनलमधील कार्यक्रमात केली.

तो पुढे म्हणाला की, भारतीय ड्रेसिंग रुम दोन गटात विभागली होती. विराट कोहली आणि केएल राहुल (KL Rahul) वेगवेगळे बसले होते. विराट कोहली सामन्य नव्हता. तो कर्णधार होता त्यावेळीची बॉडी लँग्वेज जशी असायची तशी त्याची बॉडी लँग्वेज नव्हती. दानिशने सांगितले की, कसोटी मालिका हरल्यानंतर भारतीय संघ नक्कीच कमबॅक करुन एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आतूर असायला हवी होती. मात्र केएल राहुलमध्ये अजून तो स्पार्क दिसलेला नाही.

Indian Dressing Room Divided during 1st ODI
अक्षर पटेलने आपला बर्थडे साखरपुड्याने केला गोड

राहुलला कसोटीत नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र आफ्रिकेची भागीदारी तोडण्यासाठी त्याला आपल्या गोलंदाजांना प्ररित करता आले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील आफ्रिका २९६ धावांपर्यंत पोहचले असे वाटत नव्हते. मात्र भारतीय संघात (Team India) उत्साह कमी होता. खराब कॅप्टन्सीचा फायदा फलंदाजांनी उचलला.

दानिश आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणाला की, केएल राहुलला (KL Rahul) फलंदाजीत आणि आपल्या नेतृत्व कौशल्यात दोन्हीमध्ये स्तर उंचावण्याची गरज आहे. भुवनेश्वर कुमार प्रभावी वाटला नाही. अश्विन - चहल जोडी कुलदीप - चहल जोडी एवढी प्रभावी नाही. भारताने व्यंकटेश अय्यरचा देखील वापर केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.