Darren Sammy : फक्त क्रिकेटवरचं प्रेम पोटाची खळगी भरू शकत नाही; सॅमीचे वर्मावर बोट!

Darren Sammy Statement On decline of West Indies cricket
Darren Sammy Statement On decline of West Indies cricket esakal
Updated on

Darren Sammy Statement On decline of West Indies cricket :यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीज पात्रता फेरीतूनच बाहेर पडला. यावर वेस्ट इंडीजला टी 20 वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमीने आपल्या भावना बोलून दाखवल्या. वेस्ट इंडीज क्रिकेटच्या घसरणीवर त्याने दुःख व्यक्त केले. तो म्हणाला ही गोष्ट खूप वेदना देते. त्याने संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. मात्र याचबरोबर व्यवहारिक समस्यांवर, आर्थिक स्थैर्यावर देखील त्याने बोट ठेवले.

Darren Sammy Statement On decline of West Indies cricket
T20WC22 Point Table : श्रीलंका किंग मेकर! 'या' सामन्यावर ठरणार इंग्लंड - ऑस्ट्रेलियाचे भवितव्य

सॅमीच्या मते बीसीसीआयसारखं वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना इतर फ्रांचायजी लीगमध्ये खेळण्यापासून रोखू शकत नाही. सॅमी याबाबत पीटीआयशी बोलताना म्हणतो की, 'भारत याबाबतीत खूप कडक आहे. तो त्यांच्य खेळाडूंनी इतर ठिकाणी खेळायचं नाही अस ठामपणे सांगू शकतो. तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की असं करताना त्यांच्यापाठीमागे पैशाचं मोठं गाठोडं आहे.

तो पुढे म्हणाला की, 'भारताचा अ श्रेणीतील खेळाडू वर्षाला 10 लाख डॉलरच्या आसपास कमाई करतो. (7 कोटी अधिक मॅच फी, टीव्ही राईट्स) जर वेस्ट इंडीजच्या अ श्रेणीतील खेळाडूची तुलना केली तर ते फक्त 1 लाख 50 हजार डॉलर (1.2 कोटी रूपये) पर्यंतच कमाई करतो. हा खूप मोठा फरक आहे. त्यामुळे खेळाडूंच्या मानधनचा मुद्दा हा कामय असतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या क्रिकेट बोर्डांच्याबाबतीत खेळाडूंना एकत्र ठेवणं खूप कठिण असते. विशेषकरून ज्यावेळी त्या खेळाडूंना इतर ठिकाणी बक्कळ पैसा मिळतो त्यावेळी.'

Darren Sammy Statement On decline of West Indies cricket
ENG vs NZ : इंग्लंड - न्यूझीलंडने मिळून यजमान ऑस्ट्रेलियाचीच गोची केली?

सॅमी क्रिकेटच्या प्रेमाखातर खेळाडू खेळायचे ते दिवस गेले असं सांगतो. सॅमी म्हणतो की, 'खेळाडू खेळाच्या, देशाच्या प्रेमापोटी खेळायचा आता ते दिवस गेले. प्रेम तुमच्या पोटाची खळगी भरू शकत नाही. महिन्याचा बाजार प्रेमावर भरता येत नाही.' या सर्व अडचणींवर कशी मात करायची हे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून शिकावं असं सॅमी म्हणाला.

'अशी कठिण परिस्थिती न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने चांगल्या प्रकारे हाताळली. त्यांनी आयपीएलच्या हंगामावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक आखलं नाही. न्यूझीलंडने हे चर्चा करून केलं. एक कार्यपद्धती ठरवण्याचं काम हे बोर्ड आणि खेळाडूंवर अवलंबून असतं. जर क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू एकमेकांप्रती बांधील असतील तर काही प्रमाणात दोन्हीकडून त्याग केला जाऊ शकतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.