Sri Lanka vs Afghanistan ODIs : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आशिया कप 2022 मध्ये संघाला विजय मिळवून देणाऱ्या दासून शनाकाला यावेळी संघातून वगळण्यात आले आहे. या स्टार अष्टपैलू खेळाडूला भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर श्रीलंकेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले.
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याच्याकडून श्रीलंकेच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. मात्र त्यावेळी त्याला प्लेइंग-11 मध्ये जागा मिळाली होती. पहिल्या दोन सामन्यात 8 आणि 7 धावा केल्यानंतर शनाकाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले.
आशिया कप जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही शनाकाचा फॉर्म काही दिवसापासुन घसरला आहे, त्यामुळे त्याला या मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. शनाकाची हकालपट्टी होण्यामागील सर्वात मोठे कारण तो स्वतः आहे. सततच्या खराब फॉर्ममुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ - कुसल मेंडिस (कर्णधार), चारिथ असलांका, पथम निसांका, अविस्त्का फर्नांडो, सादिरा समराविक्रम, सहन अरचीगे, शेव्हन डॅनियल्स, झेनिथ लियानगे, चमिका करुनारत्ने, महिष तेक्षाना, हसरंगा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.