Dasun Shanaka Likely To Step Down As Sri Lanka Captain : टीम इंडियाने आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. 17 सप्टेंबरला कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. भारतीय संघ विक्रमी आठव्यांदा आशियाई चॅम्पियन बनला आहे. त्याचवेळी श्रीलंकेचे सातव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी ज्याप्रकारे खेळ केला त्यामुळे कर्णधार दासून शनाकाही खूपच नाराज दिसला.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
यादरम्यान मोठी बातमीसमोर येत आहे श्रीलंकन क्रिकेट संघाचा कर्णधार दासुन शनाका आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्ड यासंदर्भात एक बैठक घेणार आहे, ज्यामध्ये दासुन शनाकाला कर्णधारपदावरून हटवण्यास मान्यता दिली जाईल.
आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये ढगाळ वातावरणात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या त्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते, त्यानंतर त्याचे कर्णधारपद धोक्यात आले यांची चर्चा सुरु झाली होती. यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड एवढा मोठा निर्णय घेणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शनाकाच्या जागी कुसल मेंडिसला श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते, अशी बातमी आहे.
कर्णधार म्हणून शनाकाने श्रीलंकेसाठी 37 सामने खेळले, त्यापैकी 23 जिंकले तर 14 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. म्हणजे त्याच्या विजयाची टक्केवारी 60.5 टक्के होती. एक कर्णधार म्हणून त्याने आठ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. 2022 चा आशिया कप श्रीलंकेने जिंकला होता तर 2023 मध्ये आशिया कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. वर्ल्डकप 2023 साठी पात्र झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.