David Warner VIDEO : वॉर्नरची आदळ-आपट अन् अंपायरला शिवीगाळ... श्रीलंका सामन्यात नेमकं काय घडलं?

What exactly happened in match Vs Sri Lanka ?
David Warner World Cup 2023
David Warner World Cup 2023esakal
Updated on

David Warner World Cup 2023 :

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामना ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स राखून जिंकला. मात्र या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि पंचांमध्ये चांगलीच वादावादी झाली. डेव्हिड वॉर्नरने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. त्याने पहिल्याच षटकात षटकार मरला होता. मात्र चौथ्या षटकात तो 11 धावा करून बाद झाला.

मात्र पंचांनी ज्या प्रकारे त्याला बाद ठरवले त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. वॉर्नर दिलशान मदुशंकाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. वॉर्नरने डीआरएस घेतला होता. मात्र अंपायर्स कॉलमुळे वॉर्नरला आपला गाशा गुंडाळावा लागला. यानंतर रागाच्या भरात वॉर्नरने अपायरकडे पाहून शिवीगाळ केली.

David Warner World Cup 2023
World Cup 2023 : वर्ल्डकप नाही द्विपक्षीय मालिका... आर्थर यांच्या वक्तव्याची आयसीसीने घेतली दखल

मदुशंकाचा एक आत येणारा चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या पॅडवर येऊन आदळला. ऑन फिल्ड अंपायरने त्याला पायचीत बाद ठरवले. मात्र निर्णयाशी असहमत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने डीआरएस घेतला. या डीआरएसमध्ये चेंडूचा टप्पा, इम्पॅक्ट हे इन लाईन होते. मात्र बॉल हिटिंग द स्टम्प मात्र संशयास्पद होता. मात्र अंपायर्स कॉल वॉर्नरला बाद ठरवणार असल्याने त्याला आपला गाशा गुंडळावा लागला. याच अंपायर्स कॉलमुळे वॉर्नरचा पारा चढला आणि त्याने अंपायर्सच्या दिशेने बघत एक शिवी दिली.

मात्र वॉर्नरची ही कृती त्याच्या चांगलीच अंगलट येऊ शकते. डेव्हिड वॉर्नरवर एका सामन्याची बंदी येण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्याच्या सामन्याचे मानधन दंड म्हणून कापून घेतले जाऊ शकते. आयसीसी कोड ऑफ कंडक्टनुसार अंपायर्सच्या निर्णयाविरूद्ध प्रमाणापेक्षा जास्त नाराजी दाखवली तर खेळाडूवर कारवाई केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()