ऑस्ट्रेलिया जवळपास 24 वर्षांनी पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौऱ्यावर गेला आहे. यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौऱ्यावर जात नव्हता. त्यामुळे जवळपास दोन दशकांनी पाकिस्तानात जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघावर जगभरातील क्रिकेट चाहत्याचे लक्ष असणार हे सहाजिकच आहे. ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान (Pakistan vs Australia) यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे पार पडला. सामन्याची विकेट पाटा असल्यानं खेळ तसा निरसच झाला. मात्र ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कंटाळलेल्या पाकिस्तानी प्रक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.
रावळपिंडीच्या पाटा खेळपट्टीवर दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून तब्बल 1187 धावा ठोकल्या. जरी या सामन्यात धावांचा पाऊस पडला असला तरी हा सामना अत्यंत कंटाळवाणा ठरला. अशा या कंटाळवाण्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने (David Warner Dance) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली प्रमाणे मैदानात डान्स (Virat Kohli Dance in Ground) करत पाकिस्तानी चाहत्यांचे मनोरंजन केले. याबाबते व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता फॉक्स क्रिकेटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली या दोघांचेही मैदानावरील डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहे. या व्हिडिओंना त्यांनी कोणाचा डान्स भारी आहे असा प्रश्न विचारला. डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानातून विराट कोहलीच्या डान्सिंगला चॅलेंज केलं आहे.
ऑस्ट्रेलिया तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तान दौरा करत आहे. या दौऱ्यावर काही दर्जेदार कामगिरी पहावयास मिळेल असे वाटत होते. मात्र रावळपिंडी (Rawalpindi Pitch) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्याच कसोटीत खेळपट्टीने (Test Pitch) सगळ्यांची निराशा केली. या खेळपट्टीवर क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांनी सडकून टीका केली आहे. काहींनी तर ही खेळपट्टीची तुलना हायवेशी केली. या खेळपट्टीवर 5 दिवसात फक्त 14 विकेट पडल्या तर तब्बल 1187 धावांचा डोंगर उभा राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.