David Warner: डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, १५ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट कडू

David Warner Retirement: ऑस्ट्रेलियाचे टी-२० विश्‍वकरंडकातील आव्हान सुपर आठ फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीचा शेवट कडू ठरला.
David Warner: डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा,  १५ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट कडू
David Warnersakal

Cricket T20 World Cup| गेली १५ वर्षे ऑस्ट्रेलियासाठी कसोटी, एकदिवसीय व टी-२० अशा तीनही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर याने सोमवारी रात्री आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि अफगाणिस्तानने मंगळवारी बांगलादेशला पराभूत केले. यामुळे ऑस्ट्रेलियाचे टी-२० विश्‍वकरंडकातील आव्हान सुपर आठ फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीचा शेवट कडू ठरला.

David Warner: डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा,  १५ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट कडू
Afghanistan Cricket: अफगाणिस्तानच्या यशात भारताचाही हातभार! बीसीसीआयची पडद्यामागून अशीही मदत

बांगलादेशविरुद्धच्या लढतीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर याने निवृत्तीबाबत संकेत देताना म्हटले होते की, पुढील २० ते ३० वर्षांच्या कालावधीत मला सँडपेपर प्रकरणाने (चेंडूशी छेडछाड करणे) ओळखले जाईल.

पण मला माहीत आहे की, क्रिकेटवर निस्मिम प्रेम करणाऱ्या व्यक्ती या खेळामध्ये बदल घडवून आणणारा खेळाडू म्हणून माझ्याकडे बघतील. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना मी घडवलेल्या बदलाबाबत मत व्यक्त केली जातील.

उल्लेखनीय यश

- दोन एकदिवसीय विश्‍वकरंडक पटकावलेल्या संघाचा सदस्य

- एक टी-२० विश्‍वकरंडक पटकावलेल्या संघाचा सदस्य

- एक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेल्या संघाचा सदस्य

David Warner: डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा,  १५ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट कडू
David Warner Video : डेव्हिड वॉर्नर 51 चेंडूत 56 धावा करून बाद झाला अन् पॅव्हेलियनचा रस्ताच विसरला

डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

कसोटी

सामने - ११२, धावा - ८७८६, शतके - २६, अर्धशतके - ३७

एकदिवसीय

सामने - १६१, धावा - ६९३२, शतके - २२, अर्धशतके - ३३

टी-२०

सामने - ११०, धावा - ३२७७, शतक - एक, अर्धशतके - २८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com