IPL Delhi Capitals News: पंतच्या गैरहजरीत दिल्लीने 'या' भारतीय खेळाडूचं केलं प्रमोशन! कर्णधार पदाची जबाबदारी वॉर्नरकडे

संघाची कमान ऋषभ पंतच्या हाती होती पण अपघातामुळे तो आयपीएलच्या 16व्या हंगामाला मुकणार आहे
Delhi Capitals IPL 2023
Delhi Capitals IPL 2023Sakal
Updated on

Delhi Capitals IPL 2023 : आयपीएल 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला कर्णधारपदाची समस्या भेडसावत होती. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी फ्रँचायझीला ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत एका खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी लागली. दिल्लीच्या वतीने ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे संघाची कमान सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पंतची बदली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Delhi Capitals IPL 2023
IND vs AUS WT20 WC: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार हरमनप्रीत अन् पूजा बाहेर?

दिल्ली फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाने याला दुजोरा दिला आहे. क्रिकबजशी बोलताना दिल्ली कॅपिटल्सच्या मालकी गटाच्या सदस्याने सांगितले की, डेव्हिड वॉर्नर आमचा कर्णधार असेल आणि अक्षर पटेल त्याचा उपकर्णधार असणार आहे. यापूर्वी संघाची कमान ऋषभ पंतच्या हाती होती. अपघातामुळे पंत आयपीएलच्या 16व्या हंगामाला मुकणार आहे. यामुळे फ्रँचायझीकडून नवीन कर्णधारपदाची घोषणा करण्यात आली आहे.

Delhi Capitals IPL 2023
IPL 2023 SRH: सनरायझर्स हैदराबादने मयंक अग्रवालला डावललं! 'या' दिग्गज खेळाडूला दिले कर्णधारपद

आयपीएल 2022 मध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने पाचव्या क्रमांकावर स्पर्धा पूर्ण केली होती. संघाने एकूण 14 पैकी 7 सामने जिंकले तर 7 गमावले. अशा स्थितीत यावेळी दिल्लीची कामगिरी कशी असेल, याकडे सर्वांच्या नजर असले. वॉर्नर बराच काळ आयपीएलमध्ये खेळत आहे. अशा स्थितीत त्याच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो एकूण 162 आयपीएल सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना 42.01 च्या सरासरीने 5881 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 4 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 126 आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()