...म्हणून पृथ्वी शॉ भारतीय संघाबाहेर

तो एक कुशल खेळाडू आहे. तसेच कोणत्याही क्रिकेट प्रकारात तो खेळू शकतो. भारतीय संघात स्थान मिळविण्यसाठी जोरदार स्पर्धा असते आणि पृथ्वीसाठी हे नक्कीच सोपे असणार नाही.
Prithvi Shaw
Prithvi ShawGoogle file photo
Updated on
Summary

तो एक कुशल खेळाडू आहे. तसेच कोणत्याही क्रिकेट प्रकारात तो खेळू शकतो. भारतीय संघात स्थान मिळविण्यसाठी जोरदार स्पर्धा असते आणि पृथ्वीसाठी हे नक्कीच सोपे असणार नाही.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लिगच्या (IPL) यंदाच्या मोसमात छाप पाडणाऱ्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) समावेश होतो. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीला खेळणाऱ्या पृथ्वी शॉने ८ सामन्यात १६६.४९ च्या स्ट्राईक रेटने ३०८ धावा फटकावल्या होत्या. सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर होता. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. (DC assistant coach Pravin Amre commented about Prithvi Shaw and team India)

Prithvi Shaw
COVID-19 Vaccine : टीम इंडिया इंग्लंडमध्ये घेणार दुसरा डोस

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पृथ्वीची निवड होऊ शकलेली नाही. यामुळे पृथ्वीचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या प्रवीण आमरे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणे पृथ्वीसाठी सोपे नाही. डोमेस्टिक क्रिकेट खेळताना आपल्या खेळामध्ये सातत्य राखणे आणि धावा करणे आवश्यक असते, असे आमरे म्हणाले.

Prithvi Shaw
कोरोनामुळे आईचे निधन, प्रियाची डोळे पाणावणारी पोस्ट

पृथ्वीविषयी बोलताना ते म्हणाले की, तो एक कुशल खेळाडू आहे. तसेच कोणत्याही क्रिकेट प्रकारात तो खेळू शकतो. भारतीय संघात स्थान मिळविण्यसाठी जोरदार स्पर्धा असते आणि पृथ्वीसाठी हे नक्कीच सोपे असणार नाही. फक्त एका चांगल्या खेळीमुळे तो भारतीय संघात परत येणार नाही. विजय हजारे ट्रॉफी त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. पण कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे असते. त्यामुळे पृथ्वीला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या मोसमाची गरज आहे.

Prithvi Shaw
Cyclone Tauktae: वानखेडेनंतर मोदी स्टेडियमवर घोंगावतय संकट

विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमधील त्याची कामगिरी बघता प्रत्येकाला त्याची भारतीय संघात निवड होईल, अशी आशा होती. अशीच कामगिरी तो करत राहिला तर एक दिवस नक्कीच त्याची निवड होईल, याची त्याला जाणीव आहे. भारतीय संघात स्थान मिळवायचं असेल, तर कामगिरी सुधारण्याकडे आणि प्रत्येक सामन्यात धावा काढणे हेच लक्ष्य असले पाहिजे, असेही आमरे म्हणाले.

क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.