MS Dhoni On Deepak Chahar : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी सहकारी खेळाडूंशी कोणताही संकोच न करता बोलण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून त्याने अनेक खेळाडूंना तयार केले, त्यांच्या कलागुणांचा उत्तम वापर केला आणि त्यांना त्यांचे विचार मोकळेपणाने मांडण्याची संधी दिली. दीपक चहर हे त्यापैकीच एक.
गेल्या काही हंगामांपासून सीएसकेकडून खेळत असलेल्या दीपकसोबत धोनीचे नाते काही खास झाले. धोनी कधी मैदानात या युवा गोलंदाजाला त्याच्या चुकीबद्दल फटकारताना दिसतो, तर कधी त्याच्याशी गप्पा मारताना दिसतो.
आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये दीपक चहर मैदानात सुस्त दिसत होता आणि त्याने काही झेल सोडले. CSK चॅम्पियन झाल्यानंतर दीपक त्याच्या टोपीवर धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला होता, तेव्हा CSK कर्णधाराने नकार दिला.
ट्रेलर लाँचदरम्यान चाहरबद्दल बोलताना धोनी म्हणाला, 'दीपक एका ड्रगसारखा आहे, जर तो तिथे नसेल तर तुम्ही विचार कराल, तो कुठे आहे, जर तो आजूबाजूला असेल तर तुम्हाला वाटेल की तो इथे का आहे? चांगली गोष्ट अशी आहे की तो परिपक्व होत आहे, परंतु त्याला वेळ लागतो आणि ही समस्या आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवण्याबाबत बोलताना 42 वर्षीय धोनीने सांगितले की चेन्नई त्याच्यासाठी खास का आहे. धोनीने सांगितले की, येथे त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत काही मोठे यश संपादन केले आहे. कसोटी पदार्पण चेन्नईमध्ये झाले होते, सर्वोच्च धावसंख्या चेन्नईमध्ये होती आणि आता तामिळमधील माझा पहिला निर्मिती चित्रपट. चेन्नई माझ्यासाठी खूप खास आहे, मला खूप पूर्वी येथे दत्तक घेण्यात आले होते.
आयपीएल 2023 च्या संपूर्ण सीझनमध्ये धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला होता. स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली. या स्पर्धेत धोनी अनेक दुखापतींमुळे लंगडत चालताना दिसला. दुसरीकडे धोनीने 7 जुलै रोजी रांची येथील त्याच्या फार्म हाऊसवर 42 वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांना आशा आहे की धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.