deepak chahar marry 1 june with girlfriend jaya bhardwaj
deepak chahar marry 1 june with girlfriend jaya bhardwaj

नवी इनिंग सुरू करण्यासाठी दीपक चहर शिकत आहे डान्स

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर 1 जूनला बांधणार लग्नगाठ
Published on

Deepak Chahar Wedding: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर 1 जूनला लग्नगाठ बांधणार आहे. दीपक त्याच्या नात्याबद्दल आधी खूप चर्चेत आला होता, तो आता आग्रा येथे आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. आयपीएल मेगा लिलावात त्याला चांगलीच बोली लागली होती. मात्र या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे दीपक एकही सामना खेळू शकला नाही. (deepak chahar marry 1 june with girlfriend jaya bhardwaj)

deepak chahar marry 1 june with girlfriend jaya bhardwaj
'हे' आहेत टीम इंडियातील राखेतून उभारी घेणारे 'फिनिक्स पक्षी'

दीपक चहर बुधवारी दिल्लीतील बाराखंबा येथे राहणारी त्याची होणारी बायको जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. दीपक चहर हा खूप दिवसापासून जया भारद्वाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. आयपीएल 2021 च्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात लाइव्ह मॅच मध्ये दीपकने जयाला स्टँडमध्ये प्रपोज केल्यावर या दोघांचे नाते चर्चेत आले. स्टेडियममध्येच दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. काही दिवसांपूर्वी जया आणि दीपक यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.

deepak chahar marry 1 june with girlfriend jaya bhardwaj
6 षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 3 भारतीय; तिसऱ्याचं नाव वाचून बसेल धक्का

जया आणि दीपक यांचा मेहंदी सोहळा आणि संगीत सोहळा आग्रा येथील फतेहाबाद रोडवर पंचतारांकित हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता हळदी समारंभ तर रात्री 9 वाजता विवाह सोहळा सुरू होईल. दीपक म्हणाला की, सध्या मी एका वेगळ्याच भावनेतून जात आहे. आयुष्यातील दुसरी इनिंग संस्मरणीय बनवण्यासाठी दीपक चहर डान्स शिकण्यासाठी घाम गाळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()