Deepak Chahar : भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. लखनौमध्ये मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. यामध्ये कर्णधार शिखर धवनने मोठा बदल केला आहे. धवनने वेगवान गोलंदाज दीपक चहरला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिलेले नाही. चहरला दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून जाणार आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी दीपकला संधी मिळू शकते असेही मानले जात आहे.
धवनने दीपकला प्लेइंग-11 मधून वगळले त्यावरून बुमराहच्या जागी संघ व्यवस्थापनाच्या प्लॅनमध्ये दीपकचे नाव नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच बीसीसीआयच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना हाच प्रश्न विचारला आहे. बीसीसीआयने पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी शेअर केलेल्या प्लेइंग-11वर टिप्पणी करताना एका यूजरने लिहिले, 'दीपक चहर भाऊ कुठे आहे? विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला पाहत नसल्याचे निश्चितपणे दिसत आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने म्हटले की, 'दीपक चहरने टी-20 मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करूनही पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का मिळाली नाही?'
पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग-11
शिखर धवन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.