Magnus Carlsen : आव्हानात्मक नाही! मॅग्नसची चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार

Magnus Carlsen : आव्हानात्मक नाही! मॅग्नसची  चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार
Updated on

Chess World Championship : सध्याच्या बुद्धीबळातील वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसेनने (Magnus Carlsen) चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मधून माघार घेतली आहे. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या मॅग्नस कार्लसेनने आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनालाच (International Chess Day) वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याने नव्या 'द मॅग्नस इफेक्ट' पॉडकास्टमध्ये तो आपली वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये डिफेंड करणार नाही असे सांगितले.

Magnus Carlsen : आव्हानात्मक नाही! मॅग्नसची  चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार
SL vs PAK : पाकिस्तानचा अब्दुल्ला सुनिल गावसकर क्लबमध्ये सामिल

मॅग्नसने वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली म्हणजे त्याने बुद्धीबळ सोडले असे नाही किंवा तो पुन्हा कधी वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळणार नाही असं नाही. तो फक्त सध्या त्याचे टायटल डिफेंड करणार नाहीये. त्याचे पुढचे उद्दिष्ट हे 2900 FIDE रेटिंग गाठण्याचे आहे.

Magnus Carlsen : आव्हानात्मक नाही! मॅग्नसची  चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार
'मी ODI मधून निवृत्ती घेतली त्यांनी T20 मधून बॅन केलं'

मॅग्नस माघारीबद्दल बोलताना म्हणाला की, 'मी पुढच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्यात माझे टायटल डिफेंड करण्यासाठी खेळणार नाही. मी आमच्या टीम सोबत चर्चा केली. त्यांनी मला काही सल्ला दिला आहे. त्यांनी दिलेल्या काही सल्ले मला आवडले काही नाही आवडले. मी गेल्या वर्षभरापासून विचार करत होतो. मी माझ्या टीमशी बोललो, मी FIDE आणि इआनशीही बोललो. त्यानंतर मला पुढचा सामना खेळणे आव्हानात्मक वाटत नाही, मला खेळण्याची प्रेरणाच मिळत नाहीये. मला या सामन्यातून काही मिळले असे वाटत नाही. मला हे आवडत नाही. असे असले तरी हा सामना ऐतिहासिक दृष्ट्या आणि बऱ्याच कारणांनी रंजक होणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.