World Cup 2023 : वर्ल्ड कपचे आयोजन केले पण स्टेडियमची अवस्था अत्यंत वाईट; BCCI ने आता उचलले हे पाऊल

या क्रिकेट स्टेडियममधील सुविधांवरून जोरदार टीका झाली त्यामुळे...
World Cup 2023
World Cup 2023 sakal
Updated on

World Cup 2023 : देशाच्या राजधानीत असलेल्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममधील प्राथमिक सुविधांवरून जोरदार टीका झाली होती, त्यामुळे येत्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी या स्टेडियमचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

आयपीएलच्या अगोदर या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना झाला होता, परंतु प्रेक्षकांसाठी स्वच्छतेच्या प्राथमिक सुविधाही नव्हत्या. स्वच्छतागृह अस्वच्छ होती याची छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले होते. त्यावरून जोरदार टीकाही झाली होती.

World Cup 2023
Ashes Series David Warner : खतरनाक स्विंग! टाँगच्या स्विंगने कांगारूंचा लंच झाला कडू, Video व्हायरल

देशातील पाच स्टेडियमच्या नूतनीकरणाची गरज असल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता, त्यात अरुण जेटली स्टेडियमचा समावेश होता. आता विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने तातडीने नूतनीकरण करण्यात येणार आहे.

येत्या विश्वकरंडक स्पर्धेतील सामने प्रेक्षकांना सुलभपणे पाहता यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगून दिल्ली क्रिकेट संघटनेचे संयुक्त चिटणीस राजन मनचंदा म्हणाले, मुळात स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेत आम्ही काही बदल करणार आहोत, त्यामुळे प्रेक्षकांना सामने पाहण्याचा आनंद मिळू शकेल. बसण्याच्या खुर्च्यांसह स्वच्छतागृह, रंगकाम आदी कामे करण्यात येणार आहेत.

World Cup 2023
धनश्री-श्रेयस अय्यरची स्टोरी अन् चर्चांना उधाण! काय आहे व्हायरल फोटो मागचे रहस्य?

या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ३५ हजारांची आहे, त्यात १० हजारांनी वाढ करण्यात येणार आहे, परंतु मुळ ढचात बदल करण्यात येणार नाही असे मनचंदा म्हणाले.

प्रेक्षकांना अतिशय स्वच्छ असलेली स्वच्छतागृहे बांधण्यासह स्वच्छ अन्न आणि पाणी कमीत कमी रतमेत आम्ही देणार आहोत. स्वच्छता करणाऱ्या व्यक्तींचीही संख्या वाढवली जाणार आहे आणि नूतनीकरणाची ही सर्व कामे १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनचंदा यांनी दिली.

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसह आयसीसीचेही सदस्य जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात स्टेडियमला भेट देऊन नूतनीकरणाचा आढावा घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()