IPL 2022: आयपीएल सुरू होण्यापुर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

दिल्ली संघातुन हा खेळाडू होउ शकतो बाहेर..
Anrich Nortje Injury Updates | Delhi Capitals
Anrich Nortje Injury Updates | Delhi CapitalsSakal
Updated on

IPL 2022: आयपीएलचा15 वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. सर्व संघ आपल्या खेळाडूसोबत सराव करताना दिसत आहेत. अनेक खेळाडू या सामन्यांना मुकणार आहेत. दिल्ली संघाचा फास्ट गोलंदाज एनरिक नॉर्टजे हा खेळाडू आयपीएल मधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वृत्तपत्रानुसार नॉर्टजे दुखापतीतुन सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तो आयपीएल मधील सामन्यांना मुकणार असल्याच बोललं आहे. (Anrich Nortje Injury Updates)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट समितीने सांगितले की नॉर्टजने गोलंदाजीला सुरूवात केलेली नाही. अद्याप नॉर्टजे दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाही. नॉर्टजे सध्या तीन आर्थोपेडिक सर्जनच्या देखरेखीत आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे चिकिस्ता अधिकारी डॉ. शुएब मांजरा याच्या देखरेखीत आहे.

Anrich Nortje Injury Updates | Delhi Capitals
Womens World Cup : हरमनप्रित एकटी पडली; भारतीय संघाचा पराभव

तीन वेगवेगळ्या आर्थोपोडिक सर्जन यांच्या देखरेखी खाली आहे. तो सध्या खेळण्यासाठी तयार नाही. तो लवकरच बरा होण्याससाठी प्रयत्न करत आहे. तो फीट आहे, भरपुर सराव करत आहे. सर्व ठिक तेव्हा होईल जेव्हा तो गोलंदाजी करेल. आम्हालाही त्याच्या दुखण्याचे कारण स्पष्ट नाही असे वैदकीय अधिकारी मुंदरा यांनी सांगितले.

Anrich Nortje Injury Updates | Delhi Capitals
आकाश चोप्राची भविष्यवाणी रोहितला खटकली!

दिल्ली संघाने नॉर्टजेला 6 कोटील रिटेन केले होते. दिल्ली संघातील चांगल्या गोलंदाजा पैकी एक गोलंदाज आहे. दिल्लीने चार खेळाडूंना रिटेन केले होते. ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्टज या खेळाडूंचा समावेश होता. दिल्ली संघाकडे मिचेल मार्श, शार्दुल ठाकुर, मुस्ताफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, चेतन सकारिया, लुंगी एनगिडी हे गोलंदाज दिल्ली संघात आहेत. या वर दिल्ली संघाने अध्याप यावर कोणती ही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.