Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून आरोप निश्चित करण्याचे आदेश

Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh Women Wrestler Sexual Harassment esakal
Updated on

Brij Bhushan Singh Women Wrestler Sexual Harassment : दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने भाजपचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरूद्ध पाच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप निश्चित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. दिल्ली कोर्टाने ब्रिजभूषणविरूद्ध विनयभंगाचा देखल गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहे. दिल्ली कोर्टाने सांगितले की ब्रिजभूषणविरूद्ध आरोप निश्चित करण्याइतके सबळ पुरावे आहेत.

ब्रिजभूषणविरूद्ध कलम 354 आणि 354 अ अंतर्गत आरोप निश्चित करा असा आदेश दिल्ली कोर्टानं दिला आहे. मात्र याचबरोबर सहाव्या महिलाकुस्तीपटूने केलेल्या आरोपांमधून कोर्टाने ब्रिजभूषणची निर्दोष मुक्तता केली आहे.

Brij Bhushan Singh
Team India Coach: द्रविड सोडणार टीम इंडियाचे प्रशिक्षकपद? BCCI नव्या गुरुच्या शोधात, जय शाह यांचा मोठा खुलासा

दिल्ली कोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाचा माजी सचिव विनोद तोमर याच्याविरूद्ध देखील महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरूद्ध सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष असलेल्या ब्रिजभूषण याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंंदोलन देखील केलं होतं. यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे भारताचे प्रसिद्ध कुस्तीपटू आघाडीवर होते.

Brij Bhushan Singh
Impact Player: रोहित शर्मासह अनेकांनी टीका केलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम IPL मधून होणार बाद? जय शाह म्हणाले...

कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा दबाव वाढल्यावर सरकारला देखील हस्तक्षेप करत ब्रिजभूषणला पदावरून हटवावं लागलं होतं. त्यानंतर देखील हा वाद संपला नाही. संजय सिंह हा ब्रिजभूषण शरण सिंहच्या गोटातीलच व्यक्ती भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष झाला. त्यानंतर साक्षी मलिकनं कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यानंतर संजय सिंह यांची देखील निवड रद्द केली.

भाजपनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंहचं खासदारकीचं तिकीट कापलं मात्र हे तिकीट त्याच्या मुलाला देण्यात आलं. त्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह हे राजकीय सत्ता आपल्या घरातच ठेवण्यात यशस्वी झाल्याची चर्चा सुरू झाली.

(Wrestling Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.