Brijbhushan Singh : अखेर जामीन मिळालाच! महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात BJP खासदार ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा

Wrestlers Protest brij bhushan sharan singh
Wrestlers Protest brij bhushan sharan singh
Updated on

Wrestlers Protest brij bhushan sharan singh : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांना गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला जामीन देताना न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय परदेश दौऱ्यावर जाता येणार नाही, अशी अट घातली आहे.

Wrestlers Protest brij bhushan sharan singh
FIFA Womens World Cup: न्यूझीलंडमध्ये मॅच सुरू होण्यापूर्वी नॉर्वे टीमच्या हॉटेलजवळ गोळीबार, दोन ठार

ब्रिजभूषणच्या जामीनाबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्ही जामीन अर्जाला विरोध किंवा समर्थन करत नाही. याआधी राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने सकाळीच सुनावणी घेऊन जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर ठीक 4 वाजता कोर्टाने कामकाज सुरू केले आणि ब्रिजभूषण यांना या प्रकरणात नियमित जामीन देण्याचा निर्णय सुनावला.

Wrestlers Protest brij bhushan sharan singh
Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण यांची धाकधुक वाढली! कुस्तीपटूंवरील लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

18 जुलै रोजी ब्रिजभूषण सिंह यांना न्यायालयाने 20 जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. आरोपी विनोद तोमरलाही अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. तसेच त्याच्या नियमित जामिनावर गुरुवारी सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

आता त्याला मोठा दिलासा मिळाला असून लैंगिक छळ प्रकरणात नियमित जामिनावर बाहेर येणार आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची गरज नाही, असे त्यांच्या वकिलांनी म्हटले. त्याचाच आधार घेत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

ब्रिजभूषण यांच्याशिवाय त्यांचे निकटवर्तीय आणि कुस्ती महासंघाचे माजी पदाधिकारी विनोद तोमर यांनाही दिलासा मिळाला आहे. त्याला एकूण 6 पैकी 2 प्रकरणांमध्ये सहआरोपीही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.