Vinesh Phogat vs Brij Bhushan Delhi Police: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून परतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने पुन्हा एकदा भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले गेले आहेत. त्यावरून विनेश, बजरंग पुनिया, साक्षी मलिक या ऑलिम्पियन कुस्तीपटूंसह अनेक खेळाडू आंदोलनाला बसले होते. हे प्रकरण मिटले असे वाटत असताना विनेशने पुन्हा एकदा ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध आखाड्यात उतरण्याची तयारी केल्याचे दिसतेय..
WFI चे माजी प्रमुख ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी तयार असलेल्या महिला कुस्तीपटूंना देण्यात आलेली सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढून घेतल्याचा आरोप विनेशने केला आहे. या प्रकरणाची दिल्ली न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. सुरक्षा मागे घेतल्याने कुस्तीपटूंच्या न्यायालयात सुरक्षितपणे उपस्थित राहण्याच्या आणि त्यांची साक्ष देण्यावर संभाव्य परिणाम होऊ शकतो, असा विनेशने दावा केला आहे. विनेशसह ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकनेही हे आरोप केले आहे.
पण, दिल्ली पोलिसांनी विनेशच्या आरोपाची दखल घेतली आणि स्पष्टीकरण दिले आहे. "सुरक्षा मागे घेण्याचा कोणताही आदेश नाही. जर सुरक्षारक्षक वेळेवर पोहोचला नसेल तर त्याची चौकशी केली जात आहे,'' असे दिल्ली पोलिसांनी म्हटले.
पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशात परतल्यानंतर विनेशने आपला WFI विरुद्धचा लढा सुरूच राहील आणि "सत्याचा विजय होईल" असा विश्वास व्यक्त केला होता.
जानेवारी २०२३ मध्ये विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण आणि धमकावल्याचा आरोप करत जंतरमंतरवर निदर्शने सुरू केले.
या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषणच्या राजीनाम्याची मागणी केली आणि WFIची समिती विसर्जित करण्याची मागणी केली. याची तक्रार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांच्याकडे त्यांनी केली.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेरी कोम आणि योगेश्वर दत्त सारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली.
क्रीडा मंत्रालयाने नंतर हस्तक्षेप केला आणि WFIला निलंबित केले. मे २०२४ मध्ये दिल्ली न्यायालयाने ब्रिजभूषण आणि विनोद तोमर यांच्यावर औपचारिकपणे आरोप निश्चित केले.
१० मे च्या आदेशात न्यायालयाने माजी WFI प्रमुखाविरुद्ध लैंगिक छळ आणि पाच महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगाच्या आरोपांसह पुढे जाण्यासाठी पुरेसे पुरावे सापडले असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.