FIFA World Cup 2022 : ट्युनिशियाने डेन्मार्कला रोखले

फिफा क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कला ३० व्या स्थानावर असलेल्या ट्युनिशियाने गोलशून्य बरोबरीत रोखले
Denmark vs Tunisia
Denmark vs Tunisiasakal
Updated on

FIFA World Cup 2022 Denmark vs Tunisia : फिफा क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कला ३० व्या स्थानावर असलेल्या ट्युनिशियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. यंदाच्या फिफा विश्वकरंडकातील गोलशून्य बरोबरीत राहणारी ही पहिलीच लढत ठरली आहे. तसेच अमेरिका - वेल्स यांच्यानंतर बरोबरीत राहणारी ही दुसरीच लढत ठरली आहे. डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर स्मायकल व ट्युनिशियाचा गोलरक्षक अयमेन दाहमेन या दोघांनी ड गटातील या लढतीत केलेली कामगिरी प्रशंसनीय ठरली.

डेन्मार्क व ट्युनिशिया है दोन्ही संघ आपल्या

भक्कम बचावासाठी ओळखले जातात. या लढतीत पदोपदी त्याचा प्रत्यय आला. दोन वेळा फुटबॉल गोलजाळ्यात गेला, पण दोन्ही वेळा ऑफसाइड देण्यात आले. त्यामुळे दोन्ही संघांना गोलपासून दूरच राहावे लागले. युरो स्पर्धेमध्ये जमिनीवर कोसळणारा ख्रिस्तियन एरिक्सन प्ले मेकरची भूमिका बजावत होता. त्याने ६८ व्या मिनिटाला मारलेल्या बुलेट किकमुळे डेन्मार्कला गोल करण्याची संधी होती, पण अयमेन दाहमेन या गोलरक्षकाने चपळ हालचालींच्या जोरावर तो फुटबॉल लीलया परतवून लावला आणि डेन्मार्कला आघाडी घेण्यापासून रोखले.

दृष्टिक्षेपात

• डेन्मार्ककडून ६०२ पासेस देण्यात आले. त्यापैकी ५३१ पास त्यांनी पूर्ण केले

• ट्युनिशियाकडून ४०६ पासेस देण्यात आले.

त्यापैकी ३२५ पासेस त्यांनी पूर्ण केले

• ट्युनिशियाला मिळालेल्या १३ शॉट पैकी फक्त एकच शॉट टार्गेटवर मारता आला, तर डेन्मार्कला ११ पैकी पाच शॉट टार्गेटवर मारता आला

• डेन्मार्कला दोन पिवळे कार्ड; तर ट्युनिशियाला १ पिवळे कार्ड दाखवण्यात आले

• डेन्मार्ककडे सामन्याच्या ६२ टक्के वेळा बॉलचा ताबा होता, तर ट्युनिशिकडे ३८ टक्के वेळ बॉलचा ताबा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()