'कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार'; अजितदादांची मोठी घोषणा, MIDC ची 12 हेक्टर जागा देण्याचे निर्देश

Deputy CM Ajit Pawar : कोल्हापुरात असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम झाल्यास त्याचा फायदा कोल्हापूरसह सांगली, सातारा परिसरातील खेळाडूंनाही होईल.
Deputy CM Ajit Pawar
Deputy CM Ajit Pawaresakal
Updated on
Summary

या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीचा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (Kolhapur District Cricket Association) करणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी विकासवाडी (ता. करवीर) च्या परिसरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (International Cricket Stadium) उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. पवार यांच्या कक्षात स्टेडियम उभारणीसंदर्भात बैठक झाली. त्यात त्यांनी हे आदेश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.