Relay Running: टीम स्पोर्टिफायची धानोरी ते पाचगणी रिले उत्साहात; शहरवासियांत फिटनेस जागृतीसाठी अनोखा उपक्रम

112 किमी अंतरावरील ही रिले शर्यत १० तास ८ मिनिटांनी पूर्ण झाली.
Team Sportify
Team Sportify
Updated on

पुणे : शहरांमध्ये फिटनेसप्रती जागरुकता निर्माण व्हावी यासाठी टीम स्पोर्टिफाय या रनिंग ग्रुपनं पुण्यातील धानोरी ते पाचगणी अशी धावण्याच्या रिले शर्यतीचं आयोजन केलं होतं. ११२ किमी अंतरावरील या शर्यतीत २१ धावपटू सहभागी झाले होते. १० तास ८ मिनिटांनी ही शर्यत पूर्ण झाली. स्पोर्टिफाई संघाचे प्रशिक्षक विजय बनसोड यांनी रिले शर्यतीचे नियोजन व मार्गदर्शन केलं. (Dhanori to Panchgani Relay of Team Sportify Unique initiative for fitness awareness among city people)

Team Sportify
Ajit Pawar: साध्वी प्रज्ञासिंह यांचा दाखला देत राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा अजितदादा, फडणवीसांना टोला

असा होता मार्ग

या रिले शर्यतीचा मार्ग धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा, शिवाजीनगर, शनिवारवाडा, दगडूशेठ हालवाई गणपती, सारगबाग, सिंहगड रोड, आंबेगाव बुद्रुक, पुणे-बेंगलोर महामार्ग, कळंबटकी घाट, वाई आणि पाचगणी असा होता. धानोरी ते पाचगणी या रिले शर्यतीला धानोरी इथं रात्री 12.30 वाजता टीम स्पोर्टिफाईचे प्रशिक्षक विजय बनसोड यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. अंतिम फेरीचा समारोप सकाळी 10:38 वाजता रवाइन हॉटेल पाचगणी इथ झाला.

Team Sportify
Manoj Jarange: भुजबळांच्या दबावाखाली येऊ नका, अन्यथा पश्चाताप होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

मदतीसाठी सपोर्ट टीम

धावपटूंच्या मदतीसाठी मार्गावर पाच सपोर्ट कार तैनात करण्यात आल्या होत्या. या शर्यतीत खंबाटकी घाट आणि पसरणी घाट हे सर्वात महत्त्वाचे टप्पे होते. कारण 15 किमीची चढण होती, जी चालताना दमछाक होत होती, परंतू सहभागींनी जोरदार धाव घेतली. (Latest Marathi News)

Team Sportify
NIA Raids: कट उधळला! NIAच्या छापेमारीत घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत; बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त

वर्षभर विविध क्रिडा स्पर्धांचं आयोजन

धावणे आणि फिटनेसबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी 2017 मध्ये धानोरी, पुणे इथं टीम स्पोर्टिफायची स्थापना करण्यात आली. गेल्या सहा वर्षांत या ग्रुपने धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, टिंगरे नगर येथील शेकडो लोकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. (Marathi Tajya Batmya)

तसेच, गट वर्षभर विविध क्रीडा कार्यक्रम आयोजित करतो आणि फिटनेस मनोरंजक बनविण्यावर लक्ष केंद्रित करतो. यापूर्वी, या संघाने 2022 आणि 2021 मध्ये अनुक्रमे धानोरी ते जेजुरी आणि धानोरी ते सिंहगड किल्ला रिले शर्यतींचं आयोजन केलं होतं.

Team Sportify
MNS on Nawab Malik: 'नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण ढोंगीपणाचा 'नकाब'...; मनसेचा फडणवीसांना टोला

'या' धावपटूंनी नोंदवला सहभाग

या रिले शर्यतीत आकाश होळकर, अनुभव कुमार, अनुप शेट्टी, अरविंद उपाध्याय, आशिष पठाडे, हितेश सिरोया, किरण शिंदे, कुणाल उपाध्ये, लक्ष्मीकांदन बालसुब्रमण्यन, मंगेश थोरात, नीरज नागर, निखिल राऊत, निनाद पाटील, निशांत चौधरी, प्रज्ञा इंगळे, संदीप पनवार, संदिप पाटील, सतेज नाझरे, श्वेता खेराज, वैभव नेहे आणि विजय बनसोड यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.