Neeraj Chopra Diamond League Rule: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या नीरज चोप्राने गुरुवारी मध्यरात्री लोझान डायमंड लीगमध्ये आश्चर्यचकित कामगिरी केली. सहापैकी चार प्रयत्नानंतर नीरज चौथ्या क्रमांकावर होता आणि आता काय तो अव्वल तीनमध्ये येत नाही असे वाटत होते. पण, भालाफेकपटू नीरज चोप्राने सॉलिड कमबॅक केले आणि शेवटच्या दोन प्रयत्नात जबरदस्त खेळ करून हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा लांब त्याने भाला फेकला.
नीरज २०२२ मध्ये डायमंड लीगचा विजेता ठरला होता आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता. पण, काल पहिल्या चार प्रयत्नांत ८३.२१ मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. पाचव्या प्रयत्नात त्याने ८५.५८ मीटर लांब भालाफेक केली आणि सहाव्या प्रयत्नात थेट ८९.४९ मीटर लांब भाला फेकला. ऑलिम्पिकमध्ये त्याने ८९.४६ मीटरसह रौप्यपदक जिंकले होते आणि तो विक्रम त्याने काल मोडला. पण, त्याला रौप्यपदक मिळाले, असे कुणीच म्हटले नाही, असे का?
२०१० पासून डायमंड लीगला सुरुवात झाली आणि मैदानी खेळातील ( Track and Field) खेळाडूंसाठी ही वार्षिक लीग असते. यात जगातील सर्वोत्तम १५ खेळाडू सहभाग घेत असतात... २०१९ मध्ये यात काही बदल केले गेले. डायमंड लीगमध्ये एकूण १५ मीट म्हणजेच १५ स्पर्धा होतात आणि त्यानंतर विजेता ठरवला जातो. २० एप्रिल ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत डायमंड लीगच्या १५ स्पर्धा होणार आहेत.
अँडरसन पीटर्स - २१ गुण ( ३ स्पर्धा)
याकुब व्हॅड्लेजच - १६ गुण ( ३ स्पर्धा)
नीरज चोप्रा - १४ गुण ( २ स्पर्धा)
ज्युलियन वेबर - १४ गुण ( २ स्पर्धा)
आर्थर फेलफ्नर - ९ गुण ( २ स्पर्धा)
एड्रीयन मार्डारे - ८ गुण ( ३ स्पर्धा )
जेंकी डीन - ६ गुण ( २ स्पर्धा)
अर्शद नदीम - ५ गुण ( १ स्पर्धा)
ऑलिव्हर हेलँडर - ५ गुण ( १ स्पर्धा )
ज्युलियस येगोक - ४ गुण ( २ स्पर्धा)
एडिस मॅतुसेव्हेव्हिसियस - ३ गुण ( १ स्पर्धा)
टोनी केरानेन - २ गुण ( १ स्पर्धा )
किशोर जेना - १ गुण ( १ स्पर्धा)
५ सप्टेंबरला ज्युरिच येथे अंतिम स्पर्धा होणार आहेत आणि यातून ब्युसेल येथे होणाऱ्या फायनलसाठी अव्वल ६ खेळाडू पात्र ठरतील. पीटर्स व व्हॅड्लेच हे फायनलसाठी पात्र ठरलेले आहेत आणि नीरजला ज्युरिच स्पर्धेत सहभाग घेऊन फायनलमध्ये एन्ट्री मिळवता येईल.
पहिला क्रमांक - ८ गुण
दुसरा क्रमांक - ७ गुण
तिसरा क्रमांक - ६ गुण
चौथा क्रमांक - ५ गुण
पाचवा क्रमांक - ४ गुण
सहावा क्रमांक - ३ गुण
सातवा क्रमांक - २ गुण
आठवा क्रमांक - १ गुण
नीरजने ज्युरिच येथे सहभाग घेतला नाही तरी तो १४ गुणांसह अव्वल ६ मध्ये कायम राहू शकतो. पण, जर जपानच्या जेंकी डीनने ती स्पर्धा जिंकली तर उलटफेर होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.