Car Racer Diana Pundole: पुण्याची रहिवासी असलेल्या २८ वर्षीय डायना पंडोलने इतिहास रचला आहे. ती कार रेसिंग चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरली आहे. तिने सलून प्रकारात इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशीप २०२४ स्पर्धा जिंकली.
डायनाने मिळवलेल्या या यशाबाबत तिचे देशभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे ती दोन मुलांची आई आहे. असे असताना कार रेसिंगमध्ये मोठे यश मिळवल्यामुळे अनेकांसाठी ती प्रेरणाही ठरत आहे.