IND vs AUS : दिनेश कार्तिकच्या हातात ट्रॉफी; ऋषभ पंत एका कोपऱ्यात

जेव्हा जेव्हा टीम इंडियाने एखादी ट्रॉफी जिंकली तेव्हा ती ट्रॉफी संघातील सर्वात युवा खेळाडूकडे दिली जाते
dinesh karthik hand trophy rishabh pant one side
dinesh karthik hand trophy rishabh pant one sidesakal
Updated on

India vs Australia : भारताने टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव करत मालिका 2-1 अशी जिंकली. जेव्हा जेव्हा टीम इंडियाने एखादी ट्रॉफी जिंकली तेव्हा ती ट्रॉफी संघातील सर्वात युवा खेळाडूकडे दिली जाते. यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसोबत त्यांचे फोटो सेशन करत असे.

टीम इंडियाने हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टी-20 मालिका जिंकली. कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफी घेतली आणि संघातील ज्येष्ठ खेळाडू दिनेश कार्तिककडे दिली. यावेळीस युवा खेळाडू ऋषभ पंत एका कोपऱ्यात उभा दिसला.

dinesh karthik hand trophy rishabh pant one side
Video : हे दृश्य पाहून वाटले वर्ल्ड कप आपलाच; दोस्ती! भावा तू खूश तर आपण खूश

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सात विकेट गमावत 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने एक चेंडू बाकी असताना चार गडी गमावत 187 धावा करून सामना जिंकला. मायदेशात नऊ वर्षांनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले. या दोघांशिवाय अक्षर पटेलने गोलंदाजीत कमाल केली.

dinesh karthik hand trophy rishabh pant one side
Ind vs Aus : भुवनेश्वर दुखरी नसच; टीम इंडियाची डेथ ओव्हरमध्ये पुन्हा धुलाई

नागपुरात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. त्या सामन्यात फिनिशिंग टच देत दिनेश कार्तिकने सॅम्सच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या स्लो बॉलवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर डीप मिड-च्या दिशेने चौकार मारला. कार्तिकने अवघ्या 2 चेंडूत 10 धावा करत दुसरा टी-20 सामना संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.